आपलं शहर

Mumbai news : मुंबईतील मुसळधार पावसाने रेल्वे वाहतूके केली विस्कळीत.

घरांचं नुकसानही झालं होतं, तर अनेक अपघातही झाले होते.

Mumbai news :मुंबई हवामान खात्याने (IMD) मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. शहरात 24 तासांच्या कालावधीत अनेक जागी जोरदार पाऊस पडण्याचे संकेत दिले आहेत. याआधी रविवारी पावसाने मुंबईच्या अनेक ठिकाणी जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे अनेक घरांचं नुकसानही झालं होतं, तर अनेक अपघातही झाले होते.

बर्‍याच भागांमध्ये, मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav Thackeray)यांनीदेखील पालिकेला सतर्कतेचा इशारा दिला होता. आयएमडीने पुढील काही दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे मुंबईतल्या अनेक ठिकाणी आपत्कालीन पथके तैनात करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धनव ठाकरे यांनी दिले आहेत.

रेल्वे क्र. 02015 मुंबई – पुणे स्पेशल एस.पी. डेपो 05.40. वाजता 19/7/2021 रोजी पोहोचणार होती, परंतु पावसामुळे अडथळे निर्माण होत असल्याने ही रेल्वे (आर / एस 11.30 वाजता) आता 19/7/2021 रोजी 15.00 वाजता पोहोचणार आहे, त्यामुळे होणा-या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाकडून दिलगिरी व्यक्त केली आहे, असे मध्य रेल्वेने ट्विट केले.

मुंबईत सेंट्रल मेन लाइन, हार्बर लाइन आणि ट्रान्स हार्बर मार्गावरील गाड्या काहीशा उशीरा धावत आहेत. आयएमडीने शहर आणि उपनगरीय भागात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे, त्यामुळे अनेक नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments