आपलं शहर

Mumbai News : वरळी ते नरिमन पॉईंट, लवकरच होणार प्रवास भन्नाट

प्रवाशांचं ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.

Mumbai News : वरळी ते नरिमन पॉईंट या सागरी किनारी  ( vorli -nariman point Sealink) मार्गावरून सुसाट प्रवास करण्याची वाट जास्त वेळ पहावी लागणार नाही. अनेक प्रवाशांचं ते स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार आहे.

2024 मध्ये या मार्गावरून 12-13 मिनिटांत वरळी ते नरिमन पॉईंट प्रवास करता येणार आहे. सागरी किनाऱ्यावरील रोडचे हे काम ऑक्टोबर 2018 मध्ये सुरु करण्यात आले आहे.

महानगरपालिकेने (BMC ) 2023 मध्ये या मार्गावरून वाहतूक सुरू करण्याचे ध्येय ठेवले आहे. परंतू अनेक विरोधांमुळे या कामामध्ये अडथळे येत असल्याने काम करण्यास वेळ लागत असल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमुळे या कामावर मोठा परिणाम झाला तर महानगरपालिकेचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. वरळी ते नरिमन पॉइंट यामधील अंतर 10:58 किलोमीटर असून यासाठी 12, 721 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

या रस्त्यामुळे कमी वेळेत जास्त अंतर पार करणे शक्य होणार तसेच इंधनामध्येही मोठी बचत केली जाणार आहे, या ठिकाणी कोणताही टोल आकारला जाणार नसल्याचं पालिका अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments