Mumbai Politics :दिवसभरातील विधानसभा कशी रंगली, वादचं नेमकं कारण काय?
सरकारकडून एम्पिरिकल डाटा मिळावा, असा ठराव मंजूर करण्यात आला.

Mumbai Politics : राजकीय आरक्षणावरून विधानसभेत मोठा गोंधळ झाला. या गोंधळात ओबीसी आरक्षणासाठी केंद्र सरकारकडून एम्पिरिकल डाटा मिळावा, असा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत मांडला होता. प्रस्तावावर विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष नेत्यांची चर्चा पार पाडली, या चर्चेदरम्यान जोरदार आरोप आणि गदारोळ पाहायला मिळाला, हा प्रस्ताव राजकीय आहे, त्यामुळे या ठरावाला ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, असे देवेंद्र फडणवीस यांनी दावा केला होता. यावरूनच भवनात मोठा गदारोळ झालेला पाहायला मिळाला.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?(Devendra fadanvis)
एम्पिरिकल डाटा हा राज्य सरकार गोळा करू शकते असं म्हणत हा निर्णय चुकीचा आहे आणि सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली त्यामुळे ओबीसींना आरक्षण मिळणार नाही, त्यावरून आम्ही विधानसभेत सरकारचा बुरखा फाडण्याचा प्रयत्न केला, मात्र सत्ताधारी पक्षाने वेगळं वातावरण निर्माण केले होते, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
भुजबळ यांच्या ठरावाला आणि सरकारच्या भूमिकेला विरोधकांनी जोरदार वाद घातला. चर्चा सुरू असतानाच काही सदस्य अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत आले. अध्यक्षांच्या समोरचा माईक हिसकावून घेण्याचाही प्रयत्न झाला. मोठ्या वादानंतर अखेर भाजपच्या 12 आमदारांने एका विर्षासाठी निलंबन करण्यात आलं, सभापतींच्या व्यासपीठावर चढून अध्यक्षांसमवेत गैरवर्तन करण्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली होती.
या सगळ्या गोंधळात तालिक अधिकारी भास्कर जाधव यांना धक्काबुक्की झाल्याचंही समोर आलं. अखेर निलंबित झालेल्या सर्व आमदारांनी राज्यपालांची भेट घेतली, विधानसभेतील संपूर्ण गोंधळाची माहिती आणि मविआ सरकारच्या वागणुकीबद्दल काही मुद्दे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
12 BJP MLAs suspended from Maharashtra assembly for one year https://t.co/sfEE6XoDzU pic.twitter.com/v8IwSkki75
— The Times Of India (@timesofindia) July 5, 2021