Mumbai rain: मुंबईत मृतांचा तांडव, मुसळार पावसाने घेतले 21 बळी, केंद्राकडून मदत
Mumbai rain:रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती

Mumbai rain:रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली होती. भूस्खलन आणि भिंत कोसळण्याच्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये 21 जणांचा मृत्यू आणि अनेकजण जखमी झाल्याची नोंद आहे. शनिवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली होती. तिन्ही घटना पूर्व आणि मध्य उपनगरांमध्ये घडल्या आहेत.
माहुलच्या भारत नगर भागात भिंत कोसळण्याच्या घटनेत आतापर्यंत 17 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यासंबंधीचे बचावकार्य सुरु आहे. विक्रोळी येथे रात्री मुसळधार पावसामुळे तीन झोपड्यांवर दरड कोसळली आहे. त्यामध्ये अनेकांचा मृत्यू झालाय. भांडुपमध्ये भिंत कोसळण्याच्या घटनेत एका व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे.
चेंबूर आणि विक्रोळी यो दोन्ही घटनेत अपघाती मृत्यू आणि जखमींची नावं#MumbaiRainUpdate #RaininMumbai #MumbaiNews pic.twitter.com/y1WysYKGbH
— आदित्य पंडीत (@AdityaP23166892) July 18, 2021
राष्ट्रपती यांचं ट्विट
मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागात मुसळधार पावसानंतर झालेल्या अनेक दुर्घटनेचे आम्हाला दु:ख आहे. शोकग्रस्त कुटुंबांसोबत आम्ही आहोत, त्यांना लवकर मदत आणि बचाव कार्य मिळेल, अशी मी इच्छा व्यक्त करतो, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडले आहे.
पंतप्रधान यांचं ट्विट
मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी येथे भिंत कोसळल्याने झालेल्या जीवितहानीमुळे मी दु:खी आहे. या दु: खाच्या घटनेत आम्ही सर्व शोकग्रस्त कुटुंबियांसमवेत आहोत. जे जखमी झाले आहेत, त्यांना लवकरात लवकर आरोग्य व्यवस्था मिळावी, अशी प्रार्थना करतो, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडलं आहे.
पंतप्रधान कार्यालयाकडून मदत
पीएमएनआरएफकडून (PMNRF – Prime Minister’s National Relief Fund) मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्याचं आश्वासन दिलं आहे तर जखमींना 50,000 रुपये देण्याचे आश्वासन केंद्र सरकारकडून करण्यात आलं आहे.