आपलं शहर

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार, पाहा कुठे, कशी परिस्थिती

मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडत आहे.

Mumbai Rain : हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार 18 ते 20 जुलै दरम्यान मुंबईला पावसाने अक्षरश: झोडपलं आहे. 2 दिवसांपूर्वीच हवामान खात्याने मुंबईत रेड अलर्ट जारी करण्यात आला होता, तशाचप्रकारे मुंबईतील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मागच्या 24 तासांत मुंबईत तब्बल 204.5 मि.मी. पेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले

मुंबईसह आजूबाजूच्या भागात शनिवारी रात्रीपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबई आणि उपनगरांमध्ये रात्रभर मुसळधार पाऊस पडत आहे. रविवारी सकाळीदेखील काही ठिकाणी पावसाचा जोर होता, हवामान विभागाकडूनही रविवारी अनेक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, अशी माहितीही हवामान आणि संशोधन विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर ( k.s.hosalikar ) यांनी दिली आहे.

;

अधिक पावसाचा अंदाज वर्तवल्यामुळे अनेक घरे, रस्ते आणि रेल्वे रुळांवर पूर आला आहे. रविवारी सकाळी चुनाभट्टी परिसरातील पूर्व द्रुतगती महामार्गावर पाणी साचल्याने अनेकजणांची तारांबळ उडाली होती. बोरिवली पूर्व, वसई-विरार या भागांमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावल्यामुळे अनेकठिकाणी पाणी साचल्याचं चित्र निर्माण झालं होतं.

चुनाभट्टी, (chunabhatti)  सायन (Sion) , दादर( Dadar)  गांधी मार्केट, चेंबूर (Chembur) आणि कुर्ला एलबीएस रोडसह अनेक भागात पाणी साचल्याची नोंद झाली आहे. यापैकी काही सखल भागातील घरांमध्येही पाणी शिरल्याने नागरिकांना मनस्ताप भोगावा लागला आहे. अनेकठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने पाण्यातून वाट काढताना नागरिक दिसत आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments