आपलं शहर

Mumbai Rain Update : मुंबईत पावसाचा हाहाकार, पाहा कुठे काय परिस्थिती

Mumbai Rain Update : गेल्या 48 तसांपासून महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड आणि नवी मुंबई या जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे.

Mumbai Rain Update : गेल्या 48 तसांपासून महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, रायगड आणि नवी मुंबई या जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मानवी जीवन विस्कळित झाले आहे. ठिकठिकाणी रस्ते, नाले, नद्यांना पूर आल्याने नागरिक हैरान झाले होते. तसेच हवामान खात्याने देखील पुढील 24 तास जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. मुंबईमधील अनेक सखल भागात पाणी साचले आहे. अनेक रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली आहे. तेच पाहुया सध्या मुंबईतील अनेक भागात काय आहे परिस्थिती.

नवी मुंबई :

नवी मुंबईतील तुर्भे पोलीस स्टेशन हे पाण्याखाली गेले आहे. कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे तुर्भे पोलीस ठाणे जलमय झाले आहे. तसेच पोलीस स्टेशन मधील सर्वच खोल्यांमध्ये पाणी शिरल्याने महिला पोलीस कर्मचाऱ्यांचीही चांगलीच दमछाक झाली. तसेच तेथील आरोपींना नेरुळ पोलीस ठाण्यात शिफ्ट करण्यात आहे आहे. महत्वाच्या वस्तूंना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. आणि अचानक अशी वेळ आल्याने पोलिसांना त्यातूनच मार्ग काढून काम करावे लागत आहे.

भिवंडी :

भिवंडीच्या रविवारी सायंकाळपासून सुरू झालेल्या पावसाची संततधार आजही कायम सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. रात्रभर झालेल्या पावसामुळे शहरातील असंख्य सखल भागात पाणी पाणी साचले आहे.

रायगड :

रायगड जिल्ह्यामध्ये प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार रायगड जिल्ह्यात 19 जुलै रोजी अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. सखल भागातील नागरिकांनी विशेषतः नदी, खाडी, समुद्र किनाऱ्याजवळील गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

नालासोपारा :

मुंबईमध्ये कालपासून होणाऱ्या जोरदार पावसामुळे अनेक दुर्घटना घडल्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे नालासपोरातील हनुमान नगर येथे एक 4 वर्षांचा मुलगा उघड्या गटाराच्या चेंबरमधून वाहून गेला आणि अजूनही बेप्पता आहे. अनमोल सिंग असे त्या मुलाचे नाव आहे. नालासोपारा पूर्वमध्ये ही दुर्दैवी घटना सकाळी 10:30 च्या सुमारस घडली होती. वसई विरार महापालिका अग्निशमन दल, स्थानिक रहिवासी यांच्या कडून शोध सुरू आहे.

कल्याण-डोंबिवली :

कल्याण डोंबिवलीमध्ये कालपासून पावसाने जोर धरला आहे. पाऊस असाच सुरु राहिला, तर सखल भागांमध्ये पाणी भरून जाईल. तसेच अतिमुसळधार पावसामुळे दगड ट्रॅकवर पडल्याने उत्तर पूर्व घाटात एक लाईन बंद झाली आहे. सेंट्रल मुंबई डीआरएमने याबाबत माहिती दिली आहे. लवकरच सर्व सेवा सुरळीत चालूं होतील असे देखील त्यांनी सांगितले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments