आपलं शहर

Mumbai Rain Update : मोदी ते अमित शाहा, पाहा काय म्हणाले मुंबईतील दुर्घटनेवर

चेंबूर, विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त करण्यात आलाय.

Mumbai Rain Update :चेंबूरमधील डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या भारतनगरमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. संततधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली अन् भिंत घरावर कोसळल्यामुळे ही दुर्वेवी घटना घडली आहे.

मुसळधार पावसामुळे चेंबूर, विक्रोळी ( chembur ,vikroli ) येथे झालेल्या दुर्घटनेवर मुख्यमंत्र्यांकडून ( pm narendra  modi ) शोक व्यक्त करण्यात आलाय. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर मोफत उपचार केले जाणार आहेत. मंत्री नवाब मलिक यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. अशाप्रकारच्या भागात राहणाऱ्या लोकांसाठी इतरत्र राहण्याची सोय करण्यासाठी एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं ते म्हणाले.

मुंबईत भिंत कोसळून मृत्यू पावलेल्यांच्या कुटुबियांना पंतप्रधान रिलिफ फंडमधून मदत जाहीर करण्यात आली आहे. मृत्यू पावलेल्यांच्या कुटुबियांना 2 लाख रुपये, जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करुन याची माहिती दिली आहे.

PM मोदी काय म्हणाले?

या दुर्घटनेतील मृतांच्या परिवारासोबत माझ्या संवेदना आहेत. जखमी झालेल्या व्यक्तींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधार व्हावी, ही प्रार्थना करतो, असं मत पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडलं आहे.

अमित शाहा काय म्हणाले?

या दर्घटनेनंतर गृहमंत्री अमित शाह यांनीही दु:ख व्यक्त केलं आहे. दुर्घटनेबाबत ऐकून स्तब्ध झालो. या दुर्घटनेत ज्यांनी आपल्या परिजनांना गमावलं आहे, त्यांच्याप्रती संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना संकटातून सावरण्याची शक्ती देवो, असं मत अमित शाहा यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे.

राष्टपती कोविंद काय म्हणाले?

राष्टपती कोविंद यांनीही मुंबईत घडलेल्या घटनेबाबत दु:ख व्यक्त केलं आहे. मुंबईत पावसामुळे झालेल्या दुर्घटनांमध्ये जीवितहानी झाल्याची बातमीने दु:ख झाले. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबाप्रती मी सहवेदना व्यक्त करतो, असेही रामनाथ कोविंद म्हणाले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments