आपलं शहर

Mumbai Rain Update : वसईविरारमध्ये पावसाचा हाहाकार, 80 नागरिकांना केलं रेस्क्यू

वसई ते वसई फाटाकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली

Mumbai Rain Update : मुंबईच्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणचा परिसर जलमय झाला आहे. अनेक सखोल भागांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने सामान्यांचे जनजिवन विस्कळीत झाले आहे.

विरार पूर्वच्या कण्हेर फाटा ( kanher fata)येथेदेखील अशीच काहीशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यादवनगर येथील नाला तुडुंब भरुन हे पाणी चाळीमध्ये शिरले आहे, दरम्यान अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरल्याने अनेक कुटुंबांचे जीवन विस्कळीत झाले आहे.

वसई विरार (Vasai Virar)महापालिकेच्या अग्निशमन दलातील जवानांनी दोरीच्या साहाय्याने जाधव पाड्यात अडकलेल्या 80 नागरिकांना रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढले आहे. यात 20 लहान मुलं, 25 महिला (यापैकी तीन गर्भवती), 30 पुरुष आणि 7 ते 8 शेळ्या बकऱ्या यांना सुखरुप बाहेर काढले आहे. हे बचाव कार्य पहाटे 5 वाजेपर्यंत चालले होते. अग्निशमन दलाच्या जवानांच्या सतर्कतेमुळे जीवितहानी टळल्याचे म्हटले जात आहे.

दरम्यान, वसई ते वसई फाटाकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. वसई मुख्य रस्त्यावर गुडघाभार पाणी साचल्याने, अनेक वाहनं बंद पडली आहेत. वसई फाट्याकडे जाणारा रस्ता, एव्हरशाईन सिग्नल, वसंत नागरी सिग्नल, सर्व पाण्याखाली गेले होते.

याआधी दोन वर्ष असे पाणी कधीच तुंबले नव्हते, परंतु काल रात्रीच्या पावसाने सर्व रस्ते जलमय झाले आहेत. विरार पूर्व विवा जहांगीर, मनवेलपाडा, विरार पश्चिम, एम बी इस्टेट, नालासोपारा पूर्व, सेंट्रल पार्क, आचोले रोड, वसई एव्हरशाईन, या ठिकाणी पाणीच पाणी झाले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments