आपलं शहर

Mumbai Rain Update: पावसामुळे पाणीपुरवठा खंडित, नागरिकांना करावी लागणार प्रतिक्षा, पाहा अपडेट

सोमवारीही पाणीपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होणार नाही,

Mumbai Rain Update : रविवारी पहाटेपासून पावसाने शहरात जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे पाणीपुरवठा खंडित झालेला आहे. सोमवारीही दिवसभर पाणीपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता नसल्याची माहिती समोर येत आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार पावसाच्या पाण्याने (bhandup water filters) जलशुद्धीकरण कॉम्प्लेक्समध्ये प्रवेश केला आणि यामुळे तांत्रिक बिघाड झाला. खबरदारीचा उपाय म्हणून या सुविधेचा वीजपुरवठा तात्पुरता थांबवावा लागला. ही पहिलीच वेळ नाही, जेव्हा या प्रकल्पात पाणी शिरले, तेव्हा असा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. पावसाचे पाणी काढून टाकण्यासाठी, पाणी गाळण्याची प्रक्रिया आणि पंपिंग यंत्रणा स्वच्छ करण्यासाठी पालिकेने काम सुरु केले आहे, दुरुस्ती व पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. (According to officials, rainwater entered the water purification complex and caused a technical glitch.)

भर पावसातदेखील रविवारी दुपारी अधिकाऱ्यांनी तीन ते चार पंप पुन्हा सुरू केले. मात्र गाळण्याची प्रक्रिया किंवा पध्दती सुरळित करण्यास अधिक वेळ लागू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

“आम्ही पाणीपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत, आम्ही काही पंपांच्या माध्यमातून पुरवठा सुरू केला आहे. परंतु कोणत्या भागात पाणी पुरवठा सुरळीत होऊ शकतो आणि कोणत्या भागाला जलद गतीने पाणी मिळू शकते, हे अद्याप ठरवले नसल्याचं उपमहानगरपालिका आयुक्त अजय राठोड यांनी सांगितले आहे.

सोमवारीही पाणीपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होणार नाही, अशी शक्यता आहे, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करावा आणि सर्व नागरिकांनी पिण्यापूर्वी पाणी उकळावे.” असे आवाहनही  (mahanagarpalika)  पालिकेकडून करण्यात येत आहे.

अनेक पूरग्रस्त भागातील झोपडपट्ट्यांमध्ये आणि तळमजल्यांच्या घरात पाणी साचले होते, काहींच्या घरात चिखलही साचला होता, अनेक कुटुंबांनी घरे साफ करण्यासाठी पावसाचे साठवलेल्या पाण्याचा वापर केला, अनेक कुटुंबीयांनी दिवसभर पिण्याच्या पाण्यासाठी बाटलीबंद पाणी घेण्यासाठी दुकानात गर्दी करावी लागली आहे, अशामुळे अनेक नागरिकांची गैरसोय झाल्याची माहितीही पालिकेकडून देण्यात आली आहे.

;blockquote class=”twitter-tweet”>

भांडुप जलशुुद्धीकरण संकुलातील यंत्रणा पूर्वपदावर येण्‍यास सुरुवात, सायंकाळच्‍या सत्रातील पाणीपुरवठा सुुरु.

Step-by-step functioning of the machinery at Bhandup Water Purification Complex has begun. Water supply of the evening session has resumed. pic.twitter.com/AuokCTAw82

— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 18, 2021

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments