आपलं शहर

Mumbai Rain Update : काय आहे पावसाची परिस्थिती, पाहा कुठे मुसळधार आणि कुठे अतिमुसळधार

मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस पडत आहे.

Mumbai Rain Update  : 15 आणि 16 जुलै रोजी मुंबईत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील 24 तासांपासून (24 hours ) वेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस पडत आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने मुंबईत पुढील 24 तासात ‘शहर आणि उपनगराच्या काही जागी हलका तर मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज’ वर्तविला आहे.(Mumbai, the capital of Maharashtra, has been receiving torrential rains overnight.)

वाढत्या पावसाच्या शक्यतेमुळे मुंबईच्या काही किनारपट्टी भागात ‘ऑरेंज’ वरून ‘रेड’ अलर्ट लागू केला आहे. काही भागात हवामान खात्याकून सतर्कतेची पातळी वाढविली आहे. मंगळवारी रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस सुरूच आहे, त्यामुळे अनेक भागात काही प्रमाणात पाणी साचत आहे. राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्रातील वैज्ञानिक आर. के. गेम्मानी (R.K .gemmani ) यांनी मुंबईतील रेड अलर्टबद्दल माहिती दिली आहे.

मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज 

शहरातील पावसाबाबत जारी करण्यात आलेल्या विशेष बुलेटिनमध्ये हवामान विभागाने म्हटले आहे की, येत्या 18 तासांत मुंबई शहर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत “मुसळधार ते अति मुसळधार पाऊस” पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे इथल्या नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे.

अतिवृष्टीमुळे सखल भाग पाण्याने भरले जातील, तसेच वीज आणि पाणी सेवा, स्थानिक रहदारी इत्यादींचा त्रास होऊ शकतो. हवामान खात्याच्या माहितीनुसार, रायगड जिल्ह्यातील दादर येथे पहाटे 8.30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासात 15.9 सेमी, परळ 13.2 सेमी, कुलाबा 12.9 सेमी, वरळी 11.7 सेमी, सांताक्रूझ 10.6 सेमी, बोरिवली 10.1 सेमी पावसाची नोंद झाली आहे.

मुंबईत पहाटेपासून मुसळधार पाऊस, पुढील काही तास मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाचे .

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments