आपलं शहर

MUMBAI RAIN UPDATES : मुंबईत काय आहे पावसाची परिस्थिती, समुद्रात भरती, मिठी नदीने ओव्हरफ्लो..

MUMBAI RAIN UPDATES : मुंबईत आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे,

MUMBAI RAIN UPDATES : मुंबईत आज काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे, अनेक ठिकाणी पावसाने जोरही धरल आहे, हवामान विभागाने 21 जुलैपासून मुंबई आणि आसपासच्या भागांध्ये मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे.
शहरातील हवामान खात्याने (IMD) मुंबईकरांसाठी रेड अलर्ट जारी केला असून शहरातील 24 तासांमध्ये जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याआधी रविवारी 18 जुलै रोजी पावसाने मुंबईसह महानगर परिसरात जोरदार हजेरी लावली होती, त्यामुळे अनेक ठिकाणी अपघातसदृष्य परिस्थिती निर्माण झाली होती, पावसामुळे झालेल्या अनेक अपघातांमध्ये अनेक जणांचा मृत्यूही झाला आहे, मुंबईच्या अनेक ठिकाणी पाणी साचल्याने रस्ते, रेल्वे वाहतूक आणि हवाई वाहतूकही काही तासांसाठी विस्कळीत झाली आहे.

आज सकाळपासून मुंबई आणि उपनगरात वेगवान वाऱ्यसह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत पावसामुळे मिठी नदी तुडुंब भरून वाहत आहे, जर आशीच परिस्थिती राहिली तर मुंबईत पुन्हा एकदा जलमय होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

मुंबईतील तलावक्षेत्रातही मुसळधार पाऊस

एकीकडे मुंबईमध्ये नेहमी पाणीकपातीच्या कारणावरून वाद होत असताना अशातच मुंबईकरांना पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी 20 जुलै रोजी समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठा 1 लाख 28 हजार दशलक्ष लिटरने वाढला आहे.

तलावांमधील पाणीसाठा, दशलक्ष लीटरमध्ये

मोडकसागर – 66,092
तानसा – 78,467
मध्य वैतरणा – 37,551
भातसा – 1,97,321
तुळशी – 8,046
विहार – 27,698

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments