फेमस

Mumbai Top News : हिंदुस्थानी भाऊची ‘राज’दरभारी एन्ट्री, VIDEO पाहून तुम्हालाही धक्का बसेल… 

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे तो जास्तच चर्चेत असतो.

Mumbai Top News : ‘बीग बॉस’ फेम विकास फाटक उर्फ “हिंदुस्तानी भाऊ” ( big boss season 13 Hindustani bhau) सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतो. हिंदुस्तानी भाऊचे लाखो चाहतेही आहेत. त्यामुळे हिंदुस्तानी भाऊ हे नाव कुणासाठी नवीन नाही. भाऊच्या प्रत्येक व्हिडीओसह कामगिरीला युवा पिढीचा चांगलाच प्रतिसाद दिसतोय.

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमुळे तो जास्तच चर्चेत असतो. हिंदुस्तानी भाऊचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हिंदुस्तानी भाऊने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आणि त्यानंतरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला दिसत आहे. (Hindustan bhau meet Raj Thackeray )

6 जुलै 2021 मंगळवारी हिंदुस्तानी भाऊने ‘मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे ‘यांची त्यांच्या निवास्थानी आज भेट घेतली. परंतु चाहत्यांना भेटी मागचे कारण अजूनही कळलेले नाही. या भेटीवेळेचा फोटो राज ठाकरे यांच्या एका फॅन पेजने फेसबुकवरील अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. भेटीनंतर हिंदुस्तानी भाऊने राज ठाकरे यांची स्तुती केली. त्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

‘जय हिंद! मी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची भेट घेतली. बाळासाहेबांनंतर जर कोणता नेता आहे, जो कुणाला घाबरत नाही, तर ते राजसाहेब ठाकरे. आपल्याला अशीच माणसं आवडतात,’ असं हिंदुस्तानी भाऊने व्हिडीओत म्हटलं आहे.

‘बिग बॉसच्या १३’ व्या सीजनपासून हिंदुस्तानी भाऊनं लोकप्रियतेचं शिखर गाठलं. आज तो युट्यूब आणि सोशल मीडियातील व्हिडीओच्या माध्यमातून सर्वांच्याच परिचयाचा झाला आहे. हिंदुस्तानी भाऊचे पाकिस्तान विरोधातील व्हिडीओ हे सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल होताना दिसतात. हिंदुस्तानी भाऊचे अनेक मीम्सही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments