खूप काही

Mumbai update : मुंबईत बर्डफ्ल्यू साथ, मात्र काळजी करण्याचं कारण नाही, कारण…

पालिकेकडून नागरिकांमध्ये प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक जनजागृती केली जाते. मुंबईमध्ये बर्डफ्ल्यूची साथ आलेली नाही. म्हणून नागरिकांनी घाबरून जाऊ नये.


Mumbai update : सध्या मुंबईमध्ये कोरोनानंतर पुन्हा एका संकटाची चाहूल लागली आहे, ती म्हणजे बर्ड फ्ल्यू. मुंबई पालिकेकडून दिलेल्या माहितीनुसार, बर्डफ्ल्यू हा आजार प्रथमतः पक्ष्यांमध्ये उद्भवतो, त्यानंतर अत्यंत कमी प्रमाणात मनुष्यामध्ये प्रसार होण्याची शक्यता असते.

या आजाराचा पक्ष्यांमध्ये उद्भव झाला, तर पक्षु संवर्धन विभागामार्फत तसे जाहीर करण्यात येते आणि त्याबाबत कार्यवाही देखील पशुसंवर्धन विभागामार्फतच राबवली जाते. बर्डफ्ल्यू आजाराचा प्रादुर्भाव मुंबईत झालाच तर पुढील नियंत्रणासाठी बृहन्मुंबई पालिका आरोग्य विभागाकडून तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती मुंबई पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पालिकेच्या सुचनेनुसार, मांस आणि अंडी पुर्ण शिजवून खावे. पोल्ट्री उत्पादनासोबत काम करताना हात साबणाने वांरवार धुवावे, व्यक्तीगत स्वच्छता राखावी, तसेच मास्क आणि ग्लोव्हजचा वापर करावा. एखाद्या व्यक्तीला बर्ड फ्ल्यूचा संसर्ग झाल्यास त्याला छोट्या आजारांपासून गंभीर आजारही होऊ शकतात.

ताप, खोकला, गळा कोरडा होणे, नाक वाहणे, मांसपेशींमध्ये वेदना, अस्वस्थता, डोकेदुखी, डोळे लाल होणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे अशी बर्ड फ्ल्यूची लक्षणे दिसू शकतात.

गर्भवती महिला, रोगप्रतिकारक शक्ती कमी असणारे आणि 65 वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना बर्ड फ्ल्यूचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. मुंबईमध्ये बर्ड फ्ल्यूची साथ पक्ष्यांमध्ये उद्भवलेली नाही. बर्डफ्लु आजाराचा प्रादुर्भाव झालाच तर नियंत्रणासाठी महानगरपालिकेचा आरोग्य विभाग सज्ज आहे.

पालिकेकडून नागरिकांमध्ये प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक जनजागृती केली जाते. मुंबईमध्ये बर्डफ्ल्यूची साथ आलेली नाही. म्हणून नागरिकांनी घाबरून जाऊ नये. साथ नसली तरीही आवश्यकता पडल्यास बर्डफ्ल्यू आजाराच्या तपासणीसाठी चाचणी नमूना पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेत पाठवण्याची सोय देखील उपलब्ध असल्याचे पालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी साांगितले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments