खूप काही

Mumbai update : पोलिसांना घरं मिळणार; नायगाव, वरळीतील bdd चाळींचं होणार पुनर्वसन

महाविकास आघाडीतील (MVA Government) नेते दौऱ्यांमध्ये व्यस्त असल्याने बीडीडी चाळ (BDD) पुनर्विकासाच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही.

Mumbai update : महाविकास आघाडीतील (MVA Government) नेते दौऱ्यांमध्ये व्यस्त असल्याने बीडीडी चाळ (BDD) पुनर्विकासाच्या कामाला अद्यापही सुरुवात झालेली नाही. या कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांची (MVA Politician) वेळ निश्चित होत नसल्याने या प्रकल्पाचे काम रखडले आहे.

वरळीतून (Worli) या प्रकल्पाच्या बांधकामाला सुरुवात करण्यासाठी उदघाटन कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रकल्पाच्या ठिकाणी भूमिपूजन होणार असल्याची माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

वरळी पोलीस वसाहतीतील 2010 सालापर्यंतच्या पोलीस रहिवाशांना कायमस्वरूपी घर मिळणार तसेच त्यानंतरच्या पोलीस रहिवाशांना मात्र तिथे घर मिळणार नाही. काही स्थानिकांचा विरोध आहे, मात्र सर्वांचा विचार करूनच निर्णय घेतल्याचं जितेंद्र आव्हाडांनी सांगितलं आहे.

या प्रकल्पासाठी सरकारने नोडल एजन्सी म्हणून म्हाडाची नेमणूक केली आहे. नायगाव येथील बीडीडी चाळ पुनर्विकासाचे काम एलऍण्डटी कंपनीला दिले आहे. ना. म. जोशी मार्गावरील चाळींच्या पुनर्विकासाचे काम शहापूरजी ऍण्ड पालनजी आणि वरळी येथील चाळींच्या पुनर्विकासासाठी टाटा कंपनीची निवड करण्यात आली आहे.

मुंबईतल्या वरळीतील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाच्या बांधकामाला अखेर मुहूर्त मिळाला आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी याबाबतची माहिती दिली आहे. 1 ऑगस्टला या प्रकल्पाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थितीत राहणार आहेत. तसेच दक्षिण आशियाई देशांतील हा सर्वात मोठा नागरी पुनर्विकास प्रकल्प असल्याचा दावाही आव्हाडांनी केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments