आपलं शहर

Mumbai Updates: चालू बांधकाम असलेली इमारत कोसळली; चार जण जखमी

जोरदार पावसाने अनेक ठिकाणी इमारती कोसळण्याने अनेक घरांचे नुकसान

Mumbai Updates : जुन्या झालेल्या इमारती कोसळण्याचे अनेक प्रकार सध्या पहायला मिळत आहेत. गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने अनेक ठिकाणी इमारती कोसळण्याने अनेक घरांचे नुकसान झाले आहे, अशीच एक घटना आज घडली आहे.

मुंबईत रात्री साडेबारा वाजता अंधेरी पश्चिम जुहू गल्ली येथील अमर सोसायटी ही चार मजली इमारत कोसळली आहे. इमारत बाजूच्या इमारतीवर कोसळल्याने या दुर्घटनेत 5 जण जखमी झाले आहेत. त्या सर्वांना कपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 5 लोकांना अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी चार तासात रेस्क्यू ऑपरेशन करून बाहेर काढले. (Five people were injured when the building collapsed on a side building)

महानगरपालिकेकडून इमारत धोकादायक जाहीर केल्यानंतरही रहिवाशी येथे राहत होते. बऱ्याच ठिकाणी अनाधिकृत बांधकामे असल्यामुळे सर्वांच्या मनामध्ये आता भीती पसरली आहे.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments