आपलं शहर

Mumbai updates : 2 आठवड्यात झालेल्या पावसाने मुंबईतील बरंच नुकसान 

पालिकेने बिरमस्टोवड प्रकल्पासह इतर उपाय योजनाचे देखील काम दिले होते.

Mumbai updates : मुंबईत पाणी तुंबण्याची समस्या दरवर्षी निर्माण होते. यावर्षी देखील सलग 2 दिवस पाऊस पडला तर सर्व मुंबई पाण्याखाली गेलेली दिसली. मुंबई महानगरपालिकेने दरवर्षी नालेसफाई , मिठी नदी रूंदीकरण, सहा पम्पिंग स्टेशन या कामात 16 वर्षात जवळपास 6 सहा हजार कोटींचा निधी वापरलाचे सांगितले आहे. परंतु अजूनही तीच परिस्थिती पहायला मिळत आहे.

पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा( Ravi raja) यांनी याबद्दल जाब विचारला आहे. 26 जुलै 2005 साली झालेल्या नुकसानीनंतर डॉ. माधवराव चितळे (dr.madhavravo chitale ) यांच्या समितीला शिफारस काम दिले होते. पालिकेने बिरमस्टोवड प्रकल्पासह इतर उपाय योजनाचे देखील काम दिले होते. परंतु कोणतेही काम पूर्ण झालेलं दिसतं नाही. 16 वर्षांनी तिच परिस्थिती आहे. असे अनेक मुद्दे रवी राजांनी समोर मांडले आहेत.

पालिकेने केलेले कामकाज 

बिरमस्टोवडचे काम हे 90% झालेले असुन यासाठी वापरण्यात आलेले प्रजन्यजल वाहिन्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता 1 तासांत 25 मिमी ते 50 मिमी इतकी आहे.

नाले सफाई , रस्ता रूंदीकरण, संरक्षण भिंत, रस्ते दुरुस्ती या सर्व कामकाजसाठी 2 हजार 238 कोटी रुपये खर्च झाला आहे. तर समुद्रातील भरतीच्या वेळी जलदगतीने बाहेर साचलेला पाण्याचा निचरा करण्यासाठी 8 ठिकाणी पंम्पिग स्टेशन तयार करण्यात आले आहेत. यातील 6 ठिकाणी काम पूर्ण झाले आहे. तर माहूल येथील काम लवकर पूर्ण होईल.

पावसाळ्यात तुंबलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी हिंदमाता येथील उड्डाणपूलाखाली अडीच हजार क्युबिक मीटर, परळ येथील सेंट झेवियर मैदानावर 30 हजार, दादर येथील प्रमोद महाजन उद्यानात 60 हजार क्युबिक मीटरचे काम केलं असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. वरळीतील गोल देऊळ भागात पाणी साठवून टाक्या बांधकाम, हे साठलेले पाणी समुद्रात सोडण्यासाठी 500 कोटीहून अधिक खर्च करण्यात येणार आहे.

मिठी नदीच्या ( mithiv river) कामाला बराच कालावधी लागला आहे, नदीच्या भिंत, नदीचे खोलीकरण, रूंदीकरण, सांडपाणी पूनप्रक्रिया या सारखी बरीच कामे यासाठी देखील खर्च झाला असल्याचं पालिकेकडून सांगण्यात येत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments