आपलं शहर

Mumbai Updates : CNG, PNG चे दर पुन्हा वाढले, पहा काय आहे परिस्थिती

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढल्या होत्या

Mumbai Updates : मुंबईत सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. आजपासून नवीन किंमती लागू करण्यात आल्या आहेत. मंगळवारी मुंबईतील महानगर गॅस लिमिटेडने प्रतियुनिट 55 पैसे आणि सीएनजीच्या दरात 258 रुपयांची वाढ केली आहे.

यापूर्वी फेब्रुवारीमध्ये सीएनजी आणि पीएनजीच्या किंमती वाढल्या होत्या.

नवे दर आजपासून लागू करण्यात आल्याची माहिती महानगर गॅस लिमिटेडकडून (Mahanagar Gas Ltd) देण्यात आली आहे. सध्या cng आणि png चे दर जरी वाढले असले, तरी पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत हे दर स्वस्त असल्याचे मत महानगरकडून सांगण्यात आलं आहे.

महानगर गॅस लिमिटेडने वाढत्या किंमती पाहून दावा केला आहे की, आता सीएनजी, पीएनजी हे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीपेक्षा खूपच स्वस्त दरात मिळत आहे.

एमजीएलने सांगितले की; नवीन दर लागू झाल्यानंतर सीएनजी, पीएनजीचे दर वाढले आहेत, पण पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत अजूनही हे दर स्वस्त आहेत. दुसरीकडे एलपीजीपेक्षा पीएनजी हे 35% टक्के स्वस्त उपलब्ध आहेत.

CNG आणि PNG च्या दरात वाढ झाल्यामुळे सार्वजनिक प्रवास देखील महागणार आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ऑटो रिक्षा आणि टॅक्सी CNG चा वापर करतात. यासोबतच BEST च्या बस आणि अनेक खासगी गाड्या देखील CNG चा वापर करतात. या दरवाढीचा मोठा परिणाम होणार असल्याचं बोलल जात आहे.

मे महिनापासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने महाराष्ट्र, राजस्थान, आंध्रप्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा ओरिसा, पंजाब, हरियाणा या राज्यांवर परिणाम झालेला आहे.

देशाची राजधानी दिल्लीत देखील महागाईचा भडका उडाला आहे. 8 जुलै रोजी दिल्लीत CNG, PNG च्या दरात वाढ झाली होती.

;

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments