आपलं शहर

Mumbai Updates : मुंबईत किती कामं पूर्ण, पहा महापौर काय म्हणतात

महानगरपालिकेकडून नालेसफाईचे काम पूर्ण झालेले नाही

Mumbai Updates :यावर्षी कोरोना असल्यामुळे मुंबईतील महानगरपालिकेचे अनेक कामे खोळंबली आहेत, दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम केल्याचा दावा पालिकेकडून केला जातो. परंतु यावर्षी उलट चित्र दिसत आहे. मुंबईतील कामे 70 टक्के पूर्ण झालेले असून तीस टक्के उर्वरित आहेत, अशी माहिती पालिकेने दिली आहे.

पावसाळ्यात मुंबई रेल्वे मार्ग बंद पडू नये, इमारती कोसळू नयेत, यासाठी मान्सूनपूर्व काम पालिका करत असते. परंतु कोरोना काळात अनेक आव्हाने पेलत विविध यंत्रणांनी पावसाळ्यात त्रास कमी व्हावा यासाठी महानगरपालिका काम करत आहे.

मुंबईत पावसाचे आगमन झाले असून अजूनही महानगरपालिकेकडून नालेसफाईचे काम पूर्ण झालेले नाही. महानगरपालिका  (BMC )कसून काम करत आहे. नाले सफाई, पाणी तुंबण्याचे संभाव्य ठिकाणे, रस्त्याची कामे आणि कोस्टल रोडच्या कामाची गती कायम ठेवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

कामाचा आढावा घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेची संपूर्ण टीम, महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष अशा अनेकांनी पावसाळी पूर्व दौरा केल्यानंतर या गोष्टी समोर आल्या.

दरवर्षी मुंबईत 70 टक्केहून अधिक नालेसफाई केली जाते. यावर्षी नालेसफाईसाठी 70 कोटीची तरतूद केली आहे. मागील वर्षी मुंबईतील मिठी नदी आणि लहान मोठ्या नाल्यांमधून 5 लाख 4 हजार 125 मेट्रिक टन गाळ निघाला होता. नाल्यातून कचरा काढण्यासाठी यंदा 470 पंप भाड्याने घेतले जातील, तर शहर उपनगरात मेट्रो रेल्वेचे काम सुरू आहे. त्यामुळे अनेक अडथळे निर्माण होउ शकतात. “मुंबईत यावर्षी इतर कचरा कमी झाला असला, तरीदेखील वैद्यकीय कचऱ्याचे प्रमाण वाढले आहे. यासगळ्यावर मुंबई महानगरपालिकेचे काम चालू आहे, परंतु पावसाळ्यात पाणी तुंबणार नाही, असा दावा आम्ही करणार नाही आणि केला तर पाणी तुंबणार नाही याची काळजी घेतली जाईल, असं मत मुंबईच्या महापौर किशोरी पेडनेकर( kishori pednekar ) यांनी मांडल आहे.

दरवर्षी परळ येथील हिंदमाता आणि शीव येथील गांधी मार्केट या भागात पाणी साचते, नियोजनपूर्वक काम केल्याने पाण्याचा निचरा येथे वेगाने होतो, असा दावा पालिकेने केला. पाणी साचणार नाही आणि उर्वरित पंप देखील या ठिकाणी कार्यरत असतात अशी प्रतिक्रिया मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments