आपलं शहर

Mumbai Updates: माळीणची पुनरवृत्ती, केंद्रासह राज्याचा मदतीचा पुढाकार

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे.

Mumbai Updates : कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात दरड कोसळण्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. रायगड येथे अतिवृष्टीमुळे दरड कोसळून आली मोठी दुर्घटना घडली आहे. एका क्षणात डोंगराच्या ढिगाऱ्याखाली आख्खं गाव गाडले गेले.

पुण्यातील माळीण दुर्घटनेची आठवण या दुर्घटनेतून पाहायला मिळाली. आतापर्यंत यात ४० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रायगड दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना 2 लाखांची मदत जाहीर केली आहे.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) ट्विट करून म्हटलंय की, रायगडमध्ये दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली. यात अनेक निष्पाप लोकांचे जीव गेले आहे. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात मी सहभागी आहे. तर राज्य सरकारकडूनही मदतीची घोषणा केली आहे, राज्य सरकारकडून दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपये आणि जखमींचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार असल्याची माहिती समोर येत आहे.

महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे पुराचा धोका निर्माण झाला आहे. दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जे जखमी झालेत त्यांना 50 हजारांची मदत केंद्राकडून देण्यात येईल. सध्या या दुर्घटनेत ४० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असल्याचंही म्हटलं जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments