आपलं शहर

Mumbai Updates : मुंबई – नागपूर हायस्पीड बुलेट ट्रेनचा प्रकल्प; बुलढाण्यात झालेले प्रेझेंटेशन

मुंबई नागपूर या मार्गाचे 70 टक्के काम पूर्ण झालेले आहे.

Mumbai updates : मुंबई-अहमदाबाद या बुलेट प्रकल्पाच्या भूसंपादनाची प्रक्रिया सुरू असताना ठाणे जिल्ह्यातून मुंबई-नागपूर या दुसऱ्या बुलेट मार्गाचे नियोजन ‘नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड’कडून करण्यात आले आहे. नागपूर दरम्यानचे 736 किमी अंतर चार तासांत पूर्ण करणाऱ्या रेल्वे कॉरिडॉरचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला आहे.

मुंबई नागपूर या मार्गाचे 70 टक्के काम पूर्ण झालेले आहे. दुसरीकडे मुंबई – नागपूर बुलेट ट्रेन हा प्रकल्प सरकारने हाती घेतला असून हाय स्पीड ट्रेनच्या बुलढाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात प्रेझेंटेशन देण्यात आले. यावेळी रेल्वे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

देशात बुलेट ट्रेनचे जाळे निर्माण करण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना केली आहे. समाज विकास अधिकारी शांता चौगुले यांनी जिल्हाधिकारी इतर अधिकाऱ्यांबरोबर प्रेझेंटेशन दिले. हायस्पीड ट्रेन्स DPR बनवण्याचे काम देखील सुरु झाले. आता रेल्वे कमिटी यावर काम सुरू करणार आहे. लवकरच डीपीआर हा अहवाल तयार करून जागतिक बँकेकडे सादर करण्यात येणार आहे. अहवाल मंजूर झाल्यावर तातडीने काम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई-नागपूर प्रकल्पामुळे राज्यांतर्गत दोन शहरे जोडली जाणार असून एकेकाळी स्वप्न असलेली बुलेट ट्रेन कमी वेळात जास्त अंतर पार करून नागरिकांना दिलासा देणार आहे. एकेकाळी स्वप्न असणारे बुलेट ट्रेन देशातील सर्व राज्यांमध्ये सुरू होणार आहे. मुंबई नागपूर बुलेट ट्रेन या शहरांदरम्यान नागपूर, वर्धा, पुलगाव, कारंजा मालेगाव, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, शहापूर ही शहरे रेल्वे मार्गाला जोडली जाणार आहेत.(The Mumbai-Nagpur project will connect two cities within the state)

जैवविविधतेचीही मोठी संपदा असलेल्या या भागात पाणथळ भूमी, कांदळवने आणि अभयारण्ये असल्याने पर्यावरणप्रेमींकडूनही अशा प्रकल्पांना विरोध केला जातो. मार्गामुळे सामाजिक आणि पर्यावरणावर नेमका काय प्रभाव पडेल.

कसा असले प्लॅनिंग : 

  •  दहा जिल्ह्यातून रेल्वेमार्ग जाणार
  • फक्त साडेतीन तासात प्रवास
  • जास्त 350 किमी प्रतितास असेल वेग
  • एकावेळी 750 प्रवासी करु शकतात प्रवास
  • वन्य परिसरात बोगदे तयार करण्यात येतील
  • गावांतील जमिनीची थेट खरेदी पद्धत केली जाईल

अडीच टक्के ग्रामीण भागातील जमीनची रक्कम देणार.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments