आपलं शहर

Mumbai updates :यावेळी पडणार मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात पाऊस, पाहा हवामान खात्याचा अंदाज.

अनेक ठिकाणी पावसाचे दमट वातावरण निर्माण झाले आहे.

Mumbai updates : गेल्या काही दिवसात बेपत्ता असलेल्या पावसाने पुन्हा एकदा मुंबईत हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबईसह उपनगरात पावासनेे हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैरान झालेल्या मुंबईकरांना दिलासाा मिळाला आहे.(Rain will fall in Mumbai and surrounding areas at this time, see Meteorological Department forecast.)

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार अरबी समुद्रात सध्या मोसमी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. बंगालच्या उपसागरात 9 कमी उंचीच्या जमिनीच्या दिशेने बाष्प येत असल्याचे सांगितले जात आहे, यामुळे कोकण किनारपट्टीवर आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने वर्तवले आहे. 9 जुलैपासून पाऊस सुरु होईल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता, तो आता खरा ठरला आहे.

अनेक ठिकाणी पावसाचे दमट वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईसह, ठाणे, कोकण विभाग, पुणे, विदर्भ, मराठवाडा या भागातही पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला होता, त्याप्रमाणे पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून दाखल झाला होता, परंतु जूनच्या अखेरच्या दिवसात पावसाने दांडी मारल्याचे पहायला मिळाले. मात्र आता खूप दिवसांच्या विश्रांतीनंतर विजांच्या कडकडाटासह आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे.

कुठे आणि कधी

10 जुलै – दरम्यान कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह मध्यमस्वरुपाचा पाऊस

6 जुलै – मुंबई-ठाण्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस

11 जुलै – मुंबई ठाण्यासह कोकण विभाग, मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पाऊस

भारतीय हवामान विभागाचे तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून येत्या पावसात राज्यातील पावसाची स्थिती कशी असेल, या विषयाची माहिती दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments