आपलं शहर

Mumbai Updates : ठाण्यानंतर राज ठाकरे पुण्याकडे रवाना, निवडणुकांच्या तोंडावर मोठी बातमी

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु

Mumbai Updates : नवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी मनकेने कंबर कसली आहे, त्या अनुषंगाने राज ठाकरे अनेक कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत. पुण्यातील काही मतदारसंघांचा आढावा देखील राज ठाकरे ( Raj Thackeray) घेत आहेत. तीन दिवसाच्या या दौऱ्यात ते एकूण 9 मतदारसंघांचा आढावा घेणार आहेत. एका दिवसांत तीन मतदार संघ म्हणजे तीन दिवसात नऊ मतदारसंघांचा आढावा घेण्याचं नियोजन राज ठाकरे यांचं असणार आहे.

नाशिक आणि ठाणे पाठोपाठ मनसेने आपला मोर्चा पुणे  ( pune) महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे वळवला आहे. राज ठाकरे 2 ऑगस्टपर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवड दौऱ्यावर राहणाऱ्या असल्याची माहिती समोर येत आहे.

महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने मनसेची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे अमित ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित ठाकरे  नाशिकचा( Amit thakrey in Nashik )  आढावा घेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अमित ठाकरे यांचा अॅक्टिवेनेस मनसे पेक्षात वाढला आहे. निवडणुकीच्या कामांमध्ये अमित ठाकरेंनी घेतलेली जबाबदारी ही येत्या काळासाठी मोठ फळ मिळवूण देणारी असू शकते, असंही मत राजकीय विश्वेषकांनी मांडलं आहे.(Over the last few days, Amit Thackeray’s activism has increased more than MNS)

नाशिक महानगर पालिकेची निवडणूक जवळ आल्याने कार्यकर्ते पक्ष नेते यांची भेट घेऊन, त्यांच्याशी संवाद साधण्यापासून निवडणुकांसाठी काय करता येईल, या सगळ्या गोष्टींचा विचार अमित ठाकरे करत आहेत. बुधवारी सकाळी 9 ते दुपारी 12 वेळेदरम्यान ते कसबा, पर्वती आणि हडपसर या ठिकाणी मनसे कार्यकर्त्यांच्या मुलाखती ते घेणार आहेत. गुरुवारी शिवाजीनगर, कोथरूड आणि कँटोन्मेंट मतदारसंघ, शुक्रवारी खडकवासला, वडगावशेरी मतदारसंघाच्या मुलाखत घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments