Mumbai updates : लवकरच JIO ला टक्कर, 5 G नेटवर्कमध्ये मोठी शर्यत
मुंबईसह अनेक शहरात 5G नेटवर्कची चाचणी

Mumbai updates : सध्या भारतात ग्राहक 4G नेटवर्क अधिक प्रमाणात वापरले जाते. तसेच भारतातील अनेक कंपन्यांनी 5G नेटवकचे टेस्टिंग सुरू केल्याने भारतात लवकरच 5G नेटवर्क सर्वांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रिलायन्स जिओने ( Reliance jio ) 5G बाबत आपली योजना जाहीर केली आहे. तसेच मुकेश अंबानी यांनी देखील वार्षिक सर्वसाधारण सभेत 5G ची घोषणा केली होती.
जिओने अत्याधुनिक स्टँडअलो 5G तंत्रज्ञान विकसित करण्यात यश मिळवले आहे. चाचणीमध्ये 1GBPS पर्यंत स्पीड देखील मिळाला आहे. जियो सध्या दिल्ली, मुंबईसह (Mumbai) अनेक शहरात 5G नेटवर्कची चाचणी करत आहे.
आता टाटा ग्रुपचा देखील यात समावेश झाला आहे. टाटा सन्सने टेलिकॉम इक्विपमेंट मेकर Tejas Network मध्ये कंट्रोलिंग हिस्सेदारी खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या करारानंतर आता टाटा ग्रुपची 5G मध्ये एंट्री होणार आहे. नोकिया, Ericsson (Nokia) आणि Huawei सारख्या कंपन्यांना टाटा ग्रुपला टक्कर देईल, त्यामुळे टाटा ग्रुप देखील 5G टेक्नोलॉजीत क्रांती करण्यास तयार असल्याचं दिसून येते.
आता टाटा ग्रुप (Tata group )देखील तेजसमध्ये हिस्सेदारी खरेदी करत जीओला जोरदार टक्कर देण्याच्या तयारीत करत आहे. या करारानंतर आता टाटा Tata ग्रुपची देखील 5G मध्ये एंट्री होणार आहे. तेजस नेटवर्क आणि टाटा TATA सन्सकडून पीएलआय स्कीम अंतर्गत इन्सेंटिव्हसाठी देखील अर्ज करण्यात आला आहे. तेजसच्या स्थापनेचा उद्देशच टेलिकॉम कंपन्यांना इक्विपमेंट्सचा पुरवठा करणे हा आहे. एकीकडे jio भारताताला 2Gमुक्त करत, 5G युक्त करण्याची घोषणा करत आहे.
Watch now!@moneycontrolcom #JioTalks https://t.co/HW5uqFrUtx
— JioTalks (@JioTalks) December 3, 2020