आपलं शहर

Mumbai updates : येणाऱ्या निवडणुकीत याचे पडसाद दिसतील, व्यापारी भडकले

व्यापारी आर्थिक परिस्थितीच्या टंचाईत अडकले

Mumbai updates :मुंबईतील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट पाहता काही निर्बंध शिथिल केले आहेत, परंतु व्यापारावरील निर्बंध शिथिल न केल्याने दादरमध्ये सोमवारी व्यापारी वर्गाकडून आंदोलन करण्यात आले. सर्वत्र शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते 7 वाजेपर्यंत दुकाने उघडण्याची परवानगी द्यावी, अशा मागण्या व्यापाऱ्यांनी केल्या आहेत. (An agitation was staged in Dadar on Monday by traders against non-relaxation of trade restrictions.)

कोरोनातील विविध निर्बंधामुळे गेले दीड वर्ष सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळात आहे. दुकाने सुरू करूनही शनिवारी-रविवारी (Saturday- Sunday ) महत्त्वाची दुकाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागत आहे. गेल्या वर्षापासून व्यापारी केवळ खर्च करत आहेत. त्यांना कोणतेही उत्पन्न मिळत नसल्याने नाराजीचे सूर आता उमटू लागले आहेत.

परिणामी बहुतांश व्यापारी आर्थिक (economic) परिस्थितीच्या टंचाईत अडकले आहेत. व्यापारी वर्गावर अनेक कर्जचा बोजा आहे. दादरमधील बहुतांश व्यापारी नियमांचे पालन करताना दिसून येतात, तरीदेखील शासनाकडून कोणतीच परवानगी मिळत नसल्याचे इथले व्यापारी सांगत आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांसह संपूर्ण शिष्टमंडळ एकत्र येऊन आपल्या अडचणी आणि मागण्यांसाठी निषेध मोर्चा काढला होतात.

तसेच आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आगामी पालिका निवडणुकीत याचे पडसाद सर्वांना पाहायला मिळतील. तसेच सोमवार ते शुक्रवारच्या 10 ते 4 ऐवजी 10 ते 7 अशी वेळ वाढवून द्यावी. व्यापारावरील निर्बंध शिथिल न केल्यास निवडणुकांवर बहिष्कार टाकू असा इशारा मुंबईतील व्यापारी संघटनांनी दिला आहे.

दीपक देवरुखकर’ काय म्हणाले?

 ‘दीपक देवरुखकर’ आणि सुनील शहा (Sunil Shah) यांनी याबाबत अधिकृत माहिती दिली. आमचे काही प्रतिनिधी शनिवारी मुंबईत विविध ठिकाणी पाठवून तेथील परिस्थिती नेमकी काय आहे. याची माहिती घेतली, तेव्हा आमच्या निदर्शनास आले की काही भागात निर्बंध पाळले जात नाहीत, यावर कोणतीही कारवाई झाल्याचे पाहायला मिळाले नाही. त्यामुळे जिथे नियमांचे उल्लंघन होत आहे, तिथे तातडीने कारवाई करावी, मात्र जिथे नियमांचे पालन केले जात आहे, तिथे व्यावाऱ्यांना परवागी द्यावी, असे मत दीपक देवरुखकर यांनी मांडले आहे.

व्यापारी अध्यक्षांचे मत

“आठवड्यातील फक्त पाच दिवस, तेही सायंकाळी 4 वाजेपर्यंत व्यवसाय करणे व्यापार्‍यांना परवडत नाही. ग्राहकांअभावी उलाढाल खालावल्याने दुकानाचे भाडे, कर्मचार्‍यांचा पगार आणि इतर खर्च भागवणे अशक्य झाल्यामुळे अत्यावश्यक दुकाने वगळता तब्बल 25 टक्के इतर दुकानदारांनी दुकानांना कायमस्वरूपी टाळे लावल्याचा” दावा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांनी केला आहे.

किशोरी पेडणेकर यांचं मत (kishori pednekar )

“व्यापाऱ्यांचं नुकसान होत आहे. परंतु, अजूनही काही वॉर्डात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. दोन-तीन दिवसांत यावर काही तरी निर्णय होऊ शकतो, असे संकेत देतानाच काही राजकीय पक्षांकडून व्यापाऱ्यांना उकसवलं जात आहे, असा आरोर मुंबई पालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. ते चांगला मार्ग काढतील, अशी आशाही पेडणेकरांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments