आपलं शहर

Mumbai updates : मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प; रस्त्यांना आले नद्यांचे स्वरूप

जोरदार पावसाचा फटका कणकवलीला बसलेला आहे.

Mumbai updates : मुंबई आणि आसपासच्या परिसरात 2 दिवस पावसाने दाणादाण उडवली आहे. अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

मुंबईसह मुंबई-गोवा महामार्गावरील कणकवली येथे मोठ्या प्रमाणात पावसामुळे जनजीवनावर परिणाम झाला आहे. मुसळधार पावासामुळे पुन्हा एकदा मुंबईची तुंबई झाली आहे. पावासामुळे अने रस्त्यांना नदीचे स्वरुप आले होते.

मुंबई आणि गोवा महामार्गावरील कणकवली येथील रस्त्याचे चौपदरीकरण झाल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी महामार्गावर साचले आहे. वागदे येथील रस्त्यावर मुसळधार पावसाने पुन्हा पाणी साचले, त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. तीन वाजल्यापासून रस्त्यावर पाणीच पाणी पाहायला मिळत होते. वाहतूक बंद झाल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूला गाड्यांच्या रांगा पाहायला मिळत होत्या.(The road at Wagade was flooded again due to torrential rains, causing traffic jams on the highway.)

जोरदार पावसाचा फटका कणकवलीला बसलेला आहे. सायंकाळी उशिराने हे पाणी कमी होत होते. जवळ जवळ दोन ते तीन फूट पाणी रस्त्यावर साचल्याने रस्त्याला नदीचे स्वरूप आले होते. सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. वागदे गावातील घरांमध्ये देखील पाणी शिरले होते. पाणी ओसरू लागल्याने वाहतूक मार्ग संथ गतीने सुरू केल्याचे वागदेयेथील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments