खूप काही

Mumbai vaccination : मुंबई लस घोटाळ्याचे बारामती कनेक्शन, मुख्य आरोपीला अटक

बोगस लसीकरण प्रकरणात पोलिसांना मुख्य आरोपीला अटक केले.

Mumbai vaccination : मुंबईत अनेक ठिकाणी बोगस लसीकरण होत असल्याचे काही दिवसांपूर्वी आढळून आले. चौकशी करुन आज मुंबई पोलिसांनी (Mumbai police) नुकतेच मुख्य आरोपीला अटक केली आहे. बारामती येथील मुख्य आरोपी राजेश पांडे याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बोगस लसीकरणासंबंधित (fake vaccination) नोंदवण्यात आलेल्या गुन्हात राजेश पांडे या मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. अनेक दिवसांपासून सदर प्रकरणात तपास सुरू असताना बारामती परिसरात राजेश पांडे ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बोगस लसीकरण प्रकरणात पोलिसांना राजेश पांडेवर संशय होताच,त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली. परंतु काही पुरावा नसल्या कारणामुळे त्यांना राजेश पांडेला अटक करता आली नव्हती. त्यानंतर राजेश पांडे (Rajesh pandey) काही दिवसांसाठी फरार झाला, पण पोलिसांनी बारामती येथून त्याला ताब्यात घेतले आहे. बोगस लसीकरण प्रकरणात आतापर्यंत सात एफआयआर नोंदवण्यात आले आहेत आणि याबद्दल पोलिसांची चौकशीदेखील सुरू आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments