खूप काही

Mumbai vaccination : सोसायट्यांमध्ये लसीकरणासाठी BMC चे हे नियम पाळाच, अन्यथा…

मुंबईतील बोगस लसीकरणानंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) लसीकरणासंबंधी नियमावली तयार केली आहे.

Mumbai vaccination : कोरोनापासून (Corona) बचाव करण्यासाठी लसीकरण अत्यंत आवश्यक आहे. परंतु काही दिवसांपूर्वीच मुंबईत काही भागात बोगस लसीकरण (fake vaccination) मोहीम राबवत असल्याची बातमी समोर आली होती. तर आता कांदिवलीच्या हिरानंदानी सोसायटीत घडलेल्या बोगस लसीकरणानंतर मुंबई महानगरपालिकेने (BMC) लसीकरणासंबंधी नियमावली तयार केली आहे. (Follow these rules of BMC for vaccination in societies …)

महानगरपालिकेने जाहीर केलेल्या सूचनांचे प्रत्येक सोसायटीला काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक आहे. सूचनांचे पालन न केल्यास महानगरपालिकेकडून त्वरित कारवाई करण्यात येईल. लसीकरण कॅम्पच्या तीन दिवस आधी पोलिसांना, आरोग्य विभागाला माहिती देणे, अधिकृत खासगी कोव्हिड सेंटरची खातरजमा करणे, असे विविध नियम सोसायट्यांना पाळावे लागणार असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे. (new rules of vaccination)

लसीकरणाचे नियम काय आहेत?

1. रजिस्टर खासगी कोविड व्हॅक्सिनेशन सेंटरद्वारेच लसीकरण मोहीम राबवावी. (Vaccination campaign should be carried out only through the Register Private Covid Vaccination Center.)

2. कोविड व्हॅक्सिनेशन सेंटर कोविन पोर्टलवर रजिस्टर आहे की नाही हे पहावे. (See if the Covid Vaccination Center is registered on the Covin Portal.)

3. सोसायटीने सेक्रेटरीची नोडल ऑफिसर म्हणून नेमणूक करावी. (The Society should appoint the Secretary as the Nodal Officer)

4. लसीची किंमत, तारीख, खासगी कोव्हिड व्हॅक्सिनेशन सेंटरची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे. (It is mandatory to disclose the price of vaccine, date, information of private covid vaccination center.)

5. आरोग्य अधिकाऱ्यांनी लसीकरणाच्यावेळी सोसायटीला अचानक भेट द्यावी. (Health officials should pay a surprise visit to the society at the time of vaccination.)

6. लसीकरणांदरम्यान काही गडबड आढळल्यास आरोग्य अधिकाऱ्याने तात्काळ पोलिसांना कळवावे. (If anything goes wrong during the vaccination, the health officer should report it to the police immediately)

7. लस घेतल्यानंतर प्रमाणपत्राची प्रत्येकाला लिंक उपलब्ध होईल याची नोडल ऑफिसरने खबरदारी घ्यावी. (The nodal officer should ensure that a link to the certificate is available to everyone after vaccination.)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments