आपलं शहर

Mumbai:हॉटेल्सच्या बायोडिग्रेडेबल पॅकिंग ला १८% गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स (GST)

Mumbai:हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी पर्यावरणाचा समतोल राखण्याचे नियम लागू केले आहेत

Mumbai:हॉटेल आणि रेस्टॉरंट्ससाठी पर्यावरणाचा समतोल राखण्याचे नियम लागू केले आहेत. अनुकूल आणि बायोडिग्रेडेबल मटेरियलने बनवलेल्या काही पार्सल बॅग्ज वापरण्याचे आदेश काहींना देण्यात आले आहेत, मात्र या बॅग्ससाठी लागणाऱ्या जीएसटीची (GST) रक्कम ही खरेदी करणाऱ्यांकडून वसूल केली जात आहे. त्यामुळे पार्सल घेणाऱ्यांना आणखी गोष्टीची महागाई न कळत वसूल केली जाते.

पॅकिंग मटेरियलचा सर्वात मोठा ग्राहक उदाहरणात हॉटेल व्यावसायिंकाना परवडणाऱ्या बॅगसे बनवण्याचं मोठं काम सध्या सुरु आहे. मात्र त्यावरील GST कमी करावा आणि प्लास्टिकसह थर्माकोल साहित्याचा वापर बंद करावा, अशी मागणी हॉटेल संघटनांनी आता सरकारकडे केली आहे. त्यामुळे यावर काय निर्णय घेतला जातो, हे पाहाणे गरजेचे आहे. इको-फ्रेंडली बॅगासवरील वाढीव कर, तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे त्यांचा नफा मार्जिन करून खरेदीदारांना योग्य सवलत द्यावी, या मुद्द्यावर सरकार ठाम असलं तरी पार्सल बॅगवर लागणारा GST कमी करण्याची कोणतीही तयारी सरकार दाखवत नाही. शिवाय, खाद्य वितरणावर मोठा नफा असल्याने जास्त GST असलेल्या बायोडिग्रेडेबल बॅग्स वितरकांनी खरेदी कराव्यात, त्या व्यतिरिक्त पर्याय नाही. असंही सरकारचं म्हणणं आहे.

प्लास्टिकमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन आम्ही आमच्या बॅग्ज वापरामध्ये बदल केला आहे, मात्र तो बदल केल्यामुळे त्यावर लागणारा GST आम्हाला पुन्हा त्रासदायक ठरत आहे. पार्सलला लागणाऱ्या बायोडेग्रेडेबल बॅग्सवरील GST कमी केल्यास ग्राहकांवर याचा बोजा पडणार नाही, आणि यामुळे ग्राहक आणि विक्रेत्यामधील समतोल टिकून राहील, असं मत एएचआरचे (AHR) अध्यक्ष शिवानंद शेट्टी यांनी मांडलं आहे.

केवळ काही मोजक्या रेस्टॉरंट्स आणि हॉटेलांमध्ये अशा बॅगज् वापरल्या जातात. मात्र त्या पुनर्वापरा योग्य नसल्यामुळे ते फेकून दिलं जातं, अशामुळे त्यावर होणारा खर्च हा एका वेळेसाठी केला जातो आणि म्हणून त्याचा तोटा पार्सल देणाऱ्याला होतो. अशामुळे आम्ही केंद्रासह राज्य सरकारला विनंती करत आहोत की इको-फ्रेंडली बायोडिग्रेडेबल मटेरियलचा वापर करण्यासाठी जर शासनाकडून प्रोत्साहन दिले जात असेल तर त्यांवर लागणारा GST ही कमी करावा, असं मत भायखळ्यातील रेनो रेस्टॉरंटचे मालक राकेश शेट्टी यांनी मांडलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments