खूप काही

NANA PATOLE : Nana Patole भाजपवर भडकले, भर पत्रकार परिषदेत मांडलं सत्य

पॅगेसस प्रकरणी उद्या (22 जुलै रोजी) राजभवनाबाहेर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. तसेच या प्रकरणी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे करणार असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलं आहे. प

nana patole :  पॅगेसस प्रकरणी उद्या (22 जुलै रोजी) राजभवनाबाहेर आम्ही धरणे आंदोलन करणार आहोत. तसेच या प्रकरणी राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी राज्यपालांकडे निवेदनाद्वारे करणार असल्याचे मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मांडलं आहे.पत्रकारांशी ते बोलत होते, त्यावेळी त्यांनी या मुद्दावर आपलं मत मांडलं आहे.

फोन टायपिंगचा दुरुपयोग करून कर्नाटक तसेच मध्य प्रदेश सरकार पाडले गेले, ही माहिती आता समोर आली आहे. केंद्र सरकारने पॅगेसेसचा दुरुपयोग केलेला आहे, निवडणुकीदरम्यान अनेकांचे फोन टॅप केले गेले होते. संविधानिक विरोध व्यवस्थेविरोधात हे कृत्य अतिशय गंभीर आहे. सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली या सर्व प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे. असं विधान महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकारांशी बोलताना केले आहे.

विधानसभेतही मुद्दा उपस्थित केला होता, आता त्यावर कमिटी नेमून सर्व्हे कऱण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ही कमिटी लवकरात लवकर स्थापन करावी आणि त्याबद्दल संपूर्ण तपास लवकर करावा, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

कोरोनावरही बोलताना नाना पटोले यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. सरकार आपलं अपयश झाकण्यासाठी ते दुसर्‍यावर जबाबदारी ढकलत आहे, कोरोना संकटामध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर, लस पुरवण्याची सगळी व्यवस्था केंद्राने आपल्या हातात ठेवली होती. तरीदेखील राज्यात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही, असं प्रतिज्ञापत्र महाराष्ट्र सरकारने कोर्टात सादर केलं, त्यात तथ्य असल्याचं नानांनी म्हटलं आहे. नाशिकमध्ये जी घटना झाली तो एक अपघात होता, महाराष्ट्रात ऑक्सिजन अभावी एकही मृत्यू झाला नाही. मात्र नाशिकच्या पालिकेत भाजपची सत्ता आहे, त्यामुळे ऑक्सिजन यंत्रणा उभारताना नक्कीच भ्रष्टाचार होऊ शकतो, असा टोलाही नानांनी लगावला आहे.

आपल्या शेजारी राज्यात भाजपची सत्ता असलेल्या मध्य प्रदेश, गोव्यात देखील ऑक्सिजन अभावी अनेक लोकं मरण पावली. या सगळ्या पापाचे भागीदार भाजप आहे. लसीकरणामुळे कोरोनाचा धोका कमी होऊ शकतो, परंतु देशातील लोकांना लस मिळत नाही आणि आपले शत्रू राष्ट्र पाकिस्तानाला मोफत लस दिली जाते. त्यामुळे सामान्य जनतेला लॉकडाऊनला सामोरे जावं लागतं आहे. लॉकडाऊनमुळे लोकांचा रोजगार बुडत आहे, लोक देशोधडीला लागले आहेत. या सगळ्याला फक्त मोदी सरकार जबाबदार असल्याचा संतापही नानांनी व्यक्त केला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments