Narayan Rane : केंद्रीय मंत्रीपदी विराजमान झाल्यावर, नारायण राणे यांचा मोठा निर्णय…
नुकतेच केंद्रीय मंत्री पदी विराजमान झालेले नारायण राणे यांनी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, राष्ट्रीय सूक्ष्म उद्याेग आयाेग आणि खादी ग्रामाेद्याेग आयाेगाकडून सर्वेक्षण करण्यात आले हाेते.

Narayan Rane : नुकतेच केंद्रीय मंत्री पदी विराजमान झालेले नारायण राणे यांनी एका लेखी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, राष्ट्रीय सूक्ष्म उद्याेग आयाेग आणि खादी ग्रामाेद्याेग आयाेगाकडून सर्वेक्षण करण्यात आले हाेते. त्यात पंतप्रधान राेजगार निर्मिती उपक्रमातील उद्याेगांचा आढावा देखील घेण्यात आला आहे. या उपक्रमांना राेख निधी, नव्या ऑर्डर्स, मनुष्यबळ, लाॅजिस्टिक आणि कच्च्या मालाच्या पुरवठ्याबाबत अडचणी निर्माण झाल्या आहे.
सर्वेक्षणातील निष्कर्षानुसार ५७ टक्के उद्याेग महामारीच्या काळात अनेक दिवस बंद हाेते. बहुतांश उद्याेगांना व्याजमाफी तसेच अतिरिक्त आर्थिक मदतीची गरज व्यक्त केली जात आहे.८८ टक्के उद्याेगांना काेराेना महामारीचा फटका बसला आहे तर १२ टक्के उद्याेगांना लाभ मिळला आहे,५४ टक्के उद्याेगांना पगार देण्यामध्ये अडचणी निर्माण झाल्या आहे.काेराेनानंतर या क्षेत्राच्या मदतीसाठी केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत अनेक याेजना जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ५० हजार काेटींचा अतिरिक्त निधी आणि २० हजार काेटी रुपयांचे दुय्यम कर्ज देण्यात येणार आहे. तसेच २०० काेटी रुपयांपर्यंतच्या निविदांमध्ये केवळ स्वदेशी उद्याेगांनाच यात सहभागी हाेता येणार आहे.
अनेक उद्याेग महामारीच्या काळात बंद हाेते. त्यामुळे अनेक व्यवसाय देखील ठप्प झाले. त्यामुळे कर्मचाऱ्यांना पगार देण्यास अडचणी निर्माण झाल्या. जीवनावश्यक वस्तूंच्या संबंधित उद्याेगांवर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून आले.काेराेना महामारीमध्ये लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे सूक्ष्म, लघू आणि मध्यम क्षेत्रातील कंपन्यांवर विपरित परिणाम झाला हाेता. या महामारीचा पंतप्रधान राेजगार निर्मिती उपक्रमातील ८८ टक्के उद्याेगांवर विपरित परिणाम झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी लाेकसभेत दिली.