Narayan Rane : ‘थांब रे मध्ये बोलू नको’, नारायण राणेंनी प्रवीण दरेकरांना झापलं
या सगळ्यात प्रवीण दरेकरही संबंधित अधिकाऱ्याला झापण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र नारायण राणे यांचं बोलणं सुरु असल्याने राणेंनी प्रवीण दरेकरांना एकदम शांत केलं.

Narayan Rane : कोकणातील पूरग्रस्त भागाची पाहणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली. त्यांच्यासोबत या दौऱ्यावर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर देखील होते. परंतु आपल्या दौऱ्यात जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी उपस्थित नसल्याचा संताप राणेंनी व्यक्त केला. नारायण राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून झापण्याचा प्रयत्न केला, इतकच नाही तर प्रांत अधिकाऱ्यांनाही त्यांनी धारेवर धरले. मात्र या सगळ्या त्यांनी प्रवीण दरेकरांचीही बोलती बंद केली.
नक्की काय म्हणाले राणे जिल्हाधिकाऱ्यांना?
अधिकाऱ्याचं उत्तर – हसत नाही सर, मी पहिल्यापासूनच इथे
नारायण राणे – इथं काय करताय? त्यांचं आयुष्य उद्धवस्त झालं आणि तुम्ही हसताय. दात काढताय? इकडे ऑफिसमध्ये काय? तिकडे यायला पाहिजे ना तुम्ही चला दाखवा ऑफिस तुमचं कुठं आहे?
(अधिकाऱ्यांना उद्देशून) तुम्हाला सोडू का, त्या मॉबमध्ये सोडू का आता?
या सगळ्यात प्रवीण दरेकरही संबंधित अधिकाऱ्याला झापण्याचा प्रयत्न करत असतात, मात्र नारायण राणे यांचं बोलणं सुरु असल्याने राणेंनी प्रवीण दरेकरांना एकदम शांत केलं.
(प्रवीण दरेकरांच्या दिशेने हात करत) थांब रे मध्ये बोलू नको. या शब्दात राणेंनी प्रवीण दरेकरांना शांत केलं. हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आहे.
(प्रवीण दरेकरांनी हलकीशी मान डोलावली)
(पुन्हा अधिकाऱ्यांना उद्देशून) मग, मॉबमध्ये सोडून येऊ? काय चेष्टा समजली? एवढी लोकं रडत आहेत, त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, तुम्हाला काय वाटतं नाही का?
केंद्रीय मंत्री नारायण राणेंबरोबर विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर देखील पूरग्रस्त चिपळूणच्या दौऱ्यात सहभागी होते. मात्र त्या दौऱ्या दरम्यान कोणताही जिल्हाधिकारी किंवा शासकीय अधिकारी नारायण राणे यांच्यासोबत नव्हता, त्यामुळे नारायण राणे संतापले. आतापर्यंत राणेंनी अधिकाऱ्यांना झापलेला व्हिडीओ माध्यमांसमोर आला आहे, मात्र प्रवीण दरेकरांना गप्प केल्याचा नारायण राणेंचा व्हिड़ीओही आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.