खूप काही

Narayan Rane : अजित पवारांच्या टोल्याला नारायण राणेंचं उत्तर, भडकल्याच सांगितलं कारण

दरम्यान नारायण राणे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना याप्रकरणी त्यांचं मत मांडले आहे.

Narayan Rane : कोकणात पूर परिस्थितीची पाहणी करताना एका अधिकाऱ्याशी नारायण राणे बोलत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यानंतर मुख्यमंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरण्यात आल्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनदेखील नारायण राणे यांच्यावर टीका करण्यात आली.

आपण जेव्हा एखाद्या ठिकाणी जातो, तेव्हा प्रोटोकॉलप्रमाणे जिल्हाधिकारी, काम करणारी टीम मुख्यमंत्र्यांकडेच गेली पाहिजे, कोणीही मुख्यमंत्री असलं तरी असं होणार, आम्ही देखील पाच वर्ष सरकारमध्ये नव्हतो, त्यावेळी देखील संकटे काळात दौरे करायचो.

जिल्हाधिकारी कुठे, प्रांत कुठे, अशी विचारना केली नाही. अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नारायण राणे यांचे नाव न घेता नाराजी व्यक्त केली होती.

परंतु आता त्यावर दौऱ्यासाठी आलो असताना एकही अधिकारी उपस्थित नसल्यामुळे संताप व्यक्त करत फोनवरून आणि नंतर समोरासमोर त्यांनी अधिकाऱ्याला झापलं आणि जाब विचारला होता.

दरम्यान नारायण राणे यांनी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना याप्रकरणी त्यांचं मत मांडले आहे. आम्ही दौरे फिरण्यासाठी केले नाहीत, त्यांनीही करू नयेत, आम्ही पूर स्थिती पाहण्यासाठी गेलो होतो, लोकांचे नुकसान झाला आहे, याची माहिती अधिकाऱ्यांना विचारण, दाखवण आमचं काम आहे. कारण त्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अंमलबजावणी करण्याचं काम अधिकारीच करतात, त्यामुळे जिथे लोकप्रतिनिधी जातात, तिथे अधिकाऱ्यांनी आलं पाहिजे, असा नियम आहे.

त्यामुळे अधिकाऱ्याला जिथे बोलावलं होतं, पत्र पाठवून सांगितलं होतं, तिथे अधिकारी उपस्थित राहिले नाहीत, म्हणून नाराज जाहीर केल्याचं स्पष्टीकरण नारायण राणे यांनी दिलेला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments