खूप काही

NARENDAR MODI : महाराष्ट्रातील ‘या’ नेत्यांनी दिला राजीनामा, इतर नेत्यांची वर्णी, पाहा संपूर्ण यादी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. यामध्ये कोणत्या नवीन खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे आणि कोणत्या नव्या नेत्यांची वर्णी लागणार आहे, हेच आपण पाहणार आहोत.

narendar modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होत आहे. यामध्ये कोणत्या नवीन खासदारांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे आणि कोणत्या नव्या नेत्यांची वर्णी लागणार आहे, हेच आपण पाहणार आहोत.

नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत अनेक बैठका आणि चर्चा सुरू होत्या. मात्र या सर्व बदलांमुळे केंद्रातील अनेक दिग्गज मंत्र्यांना त्यांचा राजीनामा द्यावा लागणार आहे. त्याऐवजी 20 नव्या चेहऱ्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. तसेच भाजप नेते नारायण राणेंपासून ज्योतिरादित्य सिंधियांपर्यंतचे अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार आहे.

7 जुलै म्हणजेच आज सायंकाळी 6 वाजता होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात 43 मंत्र्यांना शपथ दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मोदींच्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहेत, मात्र आता ही संख्या वाढून 81 होणार आहे. त्यामुळे मोदींचं दुसऱ्या टर्मचं मंत्रिमंडळ विस्तारित मंत्रिमंडळ असणार असल्याचं सांगण्यात येत आहे. नेमके कोण कोणत्या खासदारांना संधी मिळण्याची शक्यता आहे जाणून घेऊया

या नेत्यांची नावे समोर आली आहेत.

सर्वानंद सोनोवाल (आसाम)

ज्योतिरादित्य सिंधिया (मध्यप्रदेश)

अनुप्रिया पटेल (उत्तर प्रदेश)

पशुपती पारस (बिहार)

मीनाक्षी लेखी (नवी दिल्ली)

अजय भट्ट (उत्तराखंड)

शोभा करदंलाजे (कर्नाटक)

नारायण राणे (महाराष्ट्र)

अजय मिश्र (उत्तर प्रदेश)

आरसीपी सिंह (बिहार)

भूपेंद्र,यादव (राजस्थान)

कपिल पाटिल (महाराष्ट्र)

बीएल वर्मा (उत्तर प्रदेश)

अश्ववनी वैष्णव (ओडिशा)

शांतनु ठाकूर(बंगाल) इत्यादी खासदारांची केंद्रात मंत्री मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. तसेच 27 ओबीसी नेत्यांचाही मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. त्यापैकी 5 जणांना कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. अनुसूचित जमातीच्या 8 नेत्यांचा समावेश करण्यात येणार असून यातील तिघांना कॅबिनेटमंत्रिपदी संधी मिळणार आहे.

एकूण किती मंत्र्यांनी दिले राजीनामे

केंद्रातील अनेक दिग्गज मंत्र्यांचे राजीनामासत्र सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे, केंद्रीय मंत्रिमंडळात नव्या मंत्र्यांचा समावेश होण्यासाठी आणि त्यांना संधी मिळण्यासाठी दिग्गजांना राजीनामे द्यावे लागले आहेत. राजीनामा दिलेल्या मंत्र्यांमध्ये केंद्रीय शिक्षण मंत्री निशंक, सदानंद गौडा, संतोष गंगवार आणि देबोश्री चौधरी यांची नावे समोर येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि संजय धोत्रे यांनीही मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात आणखी मोठा बदल पाहायला मिळतोय केंद्रीय मंत्रि डॉ. हर्षवर्धन हे देखील आरोग्य मंत्रीपदावरून पायउतार झाले आहे

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments