आपलं शहर

Navab Malik on Sharad Pawar : शरद पवार राष्ट्रपती होणार?’, नवाब मलिक म्हणतात..

Navab Malik on Sharad Pawar : अनेक दिवसांपासून शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या ऐकायला येत आहेत, पण त्यात कोणतेही तथ्य नसून, या सर्व बातम्या पेरण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे

Navab Malik on Sharad Pawar :  अनेक दिवसांपासून शरद पवार राष्ट्रपती होणार या बातम्या ऐकायला येत आहेत, पण त्यात कोणतेही तथ्य नसून, या सर्व बातम्या पेरण्यात आल्या असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.

कालपासून माध्यमातून पवारसाहेब राष्ट्रपती होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. तरी त्यात कोणतेही तथ्य नाही, अशी माहिती आज नवाब मलिक यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना दिली.

सध्या राष्ट्रपती पदाची निवडणूक नाही. पाच राज्यांच्या निवडणुकींच्या निकालानंतरच काय परिस्थिती असेल ते स्पष्ट होईल. मात्र पक्षांतर्गत राष्ट्रपती पदाबाबत कधीही चर्चा झाली नाही किंवा इतर पक्षांसोबतही चर्चा झालेली नाही. अशी माहिती नवाब मलिक यांनी दिली आहे.

दिल्लीत झालेल्या बैठक, तसेच विरोधी पक्ष नेत्यांशी होत असलेल्या भेटीगाठी, अशामुळे राजकीय वर्तुळात अनेक चर्चा होत आहेत, त्यातलीच एक चर्चा म्हणजेच शरद पवार हे राष्ट्रपती होण्याची होती, मात्र नवाब मलिक यांनी या गोष्टीचे खंडण केले आहे.

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments