खूप काही

NITIN GADKARI : डॉमिनोजचा मोठा निर्णय, नितीन गडकरीही देणार साथ

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच घोषणा केली आहे की ते आता देशातील वाहनांमध्ये मोठा बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याबद्दल लवकरात लवकर मी निर्णय घेणार आहे,

Nitin Gadkari : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच घोषणा केली आहे की ते आता देशातील वाहनांमध्ये मोठा बदल घडवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्याबद्दल लवकरात लवकर मी निर्णय घेणार आहे, या बदलानुसार देशातील वाहनांमध्ये केवळ पेट्रोल इंजिन नव्हे, तर फ्लेक्स-फ्यूएल इंजिन असेल.

त्यामुळे लोकांना इंधन म्हणून 100 टक्के कच्च्या तेलाचा वापर करता येणार आहे. आणि इंधनावरील पैश्यानची बचत होणार आहे.नितीन गडकरींनी यासंदर्भात निर्णय येत्या काही दिवसांत घेण्यात येईलअसे देखील म्हटले आहे. या बदलानंतर देशभरात वाहननिर्मिती उद्योगासाठी फ्लेक्स-फ्यूएल इंजिन अनिवार्य होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे.

बाजारपेठेत जास्तीत जास्त ई-बाईक्स आणण्याचा अनेक कंपन्यांचा प्रयत्न आहे. कारण सर्व साधारण बाईक्सच्या तुलनेत ई-बाईक्सचा निर्मितीचा खर्च कमी आहे.आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीवर सरकारकडून अनुदानही दिले जात आहे. त्यामुळे खर्चात नक्कीच बचत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डॉमिनोजसारख्या कंपन्या ई-बाईक्सचा वापरावर जोर धरत आहे. जेणेकरून इंधनावरील पैशाची बचत होईल.

डोमिनोज सारख्या एका मोठ्या पिझ्झा कंपनीने आता डॉमिनोज पिझ्झा डिलिव्हरी बॉईला पेट्रोल आणि डिझेलवर चालणार्‍या दुचाक्या ऐवजी इलेक्ट्रॉनिक बाईक देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसारच डोमिनोज रिवोल्ट मोटर्स या कंपनीशी करार करून कंपनीसाठी 300 ई-बाईक्स खरेदी केल्या आहेत. त्यामुळे आता लवकरच डॉमिनोज पिझ्झा डिलिव्हरी बॉईजकडे ई बाइक येणार आहेत.

रिवोल्ट मोटर्स या कंपनीशी करार केल्या नंतर डोमिनोजकडून यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून यासंदर्भात अनेक चाचण्या सुरू होत्या, इलेक्ट्रॉनिक बाईकमुळे पेट्रोल आणि डिझेलवर होणारा खर्च आणि प्रदूषण कमी होणार आहे. केंद्र सरकारकडून देखील इलेक्ट्रॉनिक वाहनांचे वापरासाठी अनुदान दिले दिले जाते, त्यामुळे आता अनेक कंपन्या इलेक्ट्रॉनिक बाईकचा वापर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. आता पुढील काळात देशभरामध्ये पेट्रोल पंपऐवजी चार्जिंग स्टेशनची संख्या वाढवण्यात येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments