खूप काही

Nitin Gadkari : नितीन गडकरींकडून महाराष्ट्राच्या नव्या मंत्र्यांचं कौतुक

केंद्र सरकारमध्ये मंत्री महाराष्ट्राचे आहेत. देशाच्या विकासाचा विचार करताना महाराष्ट्रातील प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम केंद्रातील मराठी मंत्री करतील, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

Nitin Gadkari : केंद्र सरकारमध्ये मंत्री महाराष्ट्राचे आहेत. देशाच्या विकासाचा विचार करताना महाराष्ट्रातील प्रश्नांना प्राधान्य देण्याचे काम केंद्रातील मराठी मंत्री करतील, असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे.

नवीन महाराष्ट्र सदनात केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झालेल्या नवीन मंत्र्यांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विदेशात असलेल्या मराठी बांधवांनी महाराष्ट्राला मदत करावी, असे आवाहन यावेळी नारायण राणे यांनी केले. महाराष्ट्राचे प्रश्न मी प्राधान्याने सोडवेन, रोजगार वाढीसाठीही माझा प्रयत्न असेल, असे नारायण राणे यांनी कार्यक्रमादरम्यान मत मांडलं आहे.

मराठ्यांच्या इतिहासात दिल्लीला महत्वाचं स्थान आहे. अटकेपार झेंडे दिल्लीच्या मार्गातूनच लावले गेले. या सर्व काळात मराठी

राजांनी दिल्लीत अनेक वास्तू उभारल्या आहेत. काही महत्वाच्या जागाही त्यांच्याच नावावर राहिल्या आहे. स्वातंत्र्यानंतर त्यात बराचसा बदलही झाला. पण काही गोष्टी तशाच राहिल्या. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे दिल्लीतली जमीन आणि त्यावर आता उभं असलेलं महाराष्ट्र सरकारची ‘महाराष्ट्र सदन’ ही टोलेजंग वास्तू. छगन भुजबळांच्या काळात सदनाचं काम पूर्ण झालं.

युपीएससी करण्यासाठी जे मराठी विद्यार्थी दिल्लीत येतात, त्यांच्या निवासासाठी वसतिगृह आणि मोफत ग्रंथालय सुरू करण्याचा मानस व्यक्त करून, यासाठी सर्व मंत्र्यांनी पुढाकार घेऊन हा प्रकल्प मार्गी लावावा, अशी विनंती नितीन गडकरी यांनी त्या वेळी केली. गडकरी यावेळी बोलताना म्हणाले की, मी 95-97 साली मंत्री होतो. ही वास्तू जी होती, ती गुजरात महाराष्ट्राच्या राजाची होती. स्वातंत्र्यानंतर ही गुजरात सरकारला मिळाली. त्या राजाची जी दुसरी गुजरातबाहेरची प्रॉपर्टी होती, ती महाराष्ट्राला मिळाली. ही जागा होती गुजरात सरकारच्या नावावर. त्यानंतर चीन युद्धाच्या वेळी भारत सरकारनं इथं डिफेन्सची कॉलनी बनवली.

राणेसाहेब त्यावेळेस मंत्री होते, अफझलपूरकर मुख्य सचिव होते, मी पीडब्ल्यूडी मंत्री होतो, ही जागा आपली आहे, आम्हाला मिळावी म्हणून भांडत होतो, पण आम्हाला काही हाताला लागत नव्हतं. केंद्रीय शहर विकास मंत्रालयानं ते नाकारलं.

नवीन महाराष्ट्र सदनाच्या वास्तुकरिता जमीन मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न होते. आज इथे छगन भुजबळ यांनी भव्य वास्तू उभारली, याच वास्तूत नवीन केंद्रीय मंत्र्यांचा सत्कार होतो आहे, याचा आनंद होतो.” डॉ. ज्ञानेश्वर मुळे हे दिल्लीत महाराष्ट्रातील लोकांची काळजी घेतात. त्यांच्यामुळेच दिल्लीत मराठी लोक मोठ्या प्रमाणात एकत्र आहेत. मराठी मुले उच्च पदावर यावीत, ही त्यांची तळमळ मी अनेक वर्षांपासून पाहतोय. त्यांचं मला नक्कीच कौतुक वाटतं, असं नितिन गडकरी यांच्याकडून सांगण्यात आले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments