खूप काही

Nitin Raut : पूरग्रस्त भागाच्या पाहणी वेळी, ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांचा मोठा निर्णय

संकटात सापडलेल्या नागरिकांना आणखी वीज बिल भरण्याचा डोक्याला ताप नको म्हणून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल वसुली करीता स्थगिती दिली आहे.

Nitin Raut : राज्यातील पुरस्थितीचा विचार करता, मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील 1942 गावे आणि शहरातील 9 लाख 60 हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात आणि पूरात 7 लाख 87 हजार ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. रात्रंदिवस युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे सुरू आहे, तर लवकरच उर्वरित भागाचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण 1709 गावांचा वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

14 हजार 737 रोहित्रे बंद पडली असताना 12 हजार 46 रोहित्रे सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या 489 वीज वाहिन्यांपैकी आता 411 वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत. बंद पडलेल्या 67 वीज उपकेंद्रे व स्वीचिंग केंद्रापैकी 61 केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे. दोन अतिदाब उपकेंद्रापैकी एक उपकेंद्र आता चालू झालेला आहे. अशी माहिती ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे.

संकटात सापडलेल्या नागरिकांना आणखी वीज बिल भरण्याचा डोक्याला ताप नको म्हणून ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज बिल वसुली करीता स्थगिती दिली आहे.

अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, संगमेश्वर आणि राजापूर तालुका, रायगड, कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नद्यांना पूर आला. या महापुरात महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणांचे सुद्धा आतोनात नुकसान झाले आहे. या पुरामुळे नादुरुस्त झालेल्या ग्राहकांचे मीटर त्वरित बदलून देण्याचे निर्देशही ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत.

नितीन राऊत यांनी पुरामुळे नुकसानग्रस्त झालेल्या महावितरणच्या दुधगाव, कवठेपिरान, शेरीनाला येथील 33/11 केव्ही उपकेंद्राची पाहणी केली. पुरग्रस्त भागातील पूर पाण्याची पातळी लक्षात घेऊन विद्युत यंत्रणेची उंची वाढविण्यासाठी आराखडा तयार करा असे आदेश दिले, शक्य त्या उपाययोजनांची अंमलबजावणी तातडीने करा, अशा सूचना डॉ. नितीन राऊत यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

सांगली जिल्हा दौऱ्यावर त्यांच्या सोबत सहकार, कृषी, अन्न व नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments