खूप काही

OBC Reservations : OBC विद्यार्थ्यांसाठी केंद्राचा दिलासा, EWS विद्यार्थ्यांसाठी काय फायदा

केंद्र सरकारने ओबीसी आरक्षण विषयासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना या निर्णयांमुळे दिलासा मिळण्याची शक्यता

OBC Reservations :  ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातच नव्हे, तर केंद्रातही गदारोळ माजला आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावरून देशभरामध्ये ओबीसी समाजामध्ये असंतोष आहे. उच्च शिक्षणातील या आरक्षणात मोदी सरकारने निर्णय घ्यावा, यासाठी अनेक दबाव देखील निर्माण करण्यात आले, यूपी राज्यात निवडणुका समोर आल्या असून या संदर्भातच दोन दिवसांपूर्वी मोदींनी मंत्र्यांना प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्यानंतर आता हा ओबीसी आरक्षणाचा निर्णय घेण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातच नव्हे तर केंद्रातही ओबीसी आरक्षणावरून अनेक चढ-उतार पाहायला मिळत आहेत. परंतु आता केंद्र सरकारने ओबीसी आरक्षण विषयासंबंधी मोठा निर्णय घेतला आहे. ओबीसी आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील उमेदवारांना या निर्णयांमुळे दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ओबीसी तसेच ईडब्ल्यूएस वर्गातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. सरकारकडून मेडिकलच्या कोर्समध्ये ओबीसींसाठी 27% आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. तर इडब्ल्यूएसच्या प्रवर्गातील उमेदवारांना 10 टक्के आरक्षण मिळणार आहे. तसेच हा निर्णय देशपातळीवर लागू असणार आहे.

2021-22 या वर्षापासून हा निर्णय लागू करण्यात येईल. तसेच ओबीसी (OBC) आणि ईडब्लूएस (EWS)अशा दोन्ही वर्गांना या आरक्षणाचा फायदा होणार आहे. यात अंडरग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकल / डेंटल कोर्समध्ये (MBBS / MD / MS / Diploma / BDS / MDS) ओबीसींना 27 टक्के तर EWS च्या विद्यार्थ्यांना 10 टक्के रिजर्व्हेशनचा फायदा मिळणार आहे. या आरक्षणाचा फायदा ऑल इंडिया कोटा स्कीम (AIQ)च्या माध्यमातून मिळेल.

एका अहवालानुसार कमीत कमी 5 हजार 550 विद्यार्थ्यांना मोदी सरकारच्या या निर्णयाचा लाभ घेता येणार आहे. दरवर्षी MBBS च्या दीड हजार OBC विद्यार्थ्यांना तर पोस्ट ग्रॅज्युएट करणाऱ्या 2500 ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळेल. तर EWS च्या आरक्षणाचा लाभ एमबीबीएसमध्ये 550 तर पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये 1000 विद्यार्थ्यांना आरक्षण मिळेल. विशेष म्हणजे सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये एकूण जागांच्या 15 टक्के जागा या UG म्हणजे अँडरग्रॅज्युएट तर पोस्ट ग्रॅज्युएटच्या 50 टक्के सीट्स ऑल इंडिया कोट्यात येतात.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments