फेमस

Olympic 2020 :ऑलम्पिकमध्ये भारताला मोठं यश, प्रिया मलिकची सुवर्ण कामगिरी

Olympic 2020 :जपानच्या टोकियोमध्ये सुरु असलेल्या ऑलम्पिकमध्ये भारताला सुवर्ण यश मिळाले आहे

Olympic 2020:  जपानच्या टोकियोमध्ये सुरु असलेल्या ऑलम्पिकमध्ये भारताला सुवर्ण यश मिळाले आहे. भारताला दुसऱ्या दिवशी पुन्हा एक सुवर्ण पदक प्राप्त झाले आहे, मीराबाई चानूनंतर कॅडेट कुस्ती चॅम्पियनमध्ये भारताला मोठं यश मिळालं आहे. भारताची महिला कुस्तीपटू प्रिया मलिकने हंगेरीमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवले आहे. प्रियाने बेलारूसच्या कुस्तीपटूचा 5-0 असा पराभव करून जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले आहे.
प्रियाने याआधी पुण्यात 2019 च्या खेलो इंडियामध्ये सुवर्ण पदक, 2019 च्या दिल्लीतील 17 व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्ण पदक आणि 2020 मध्ये पटना येथे राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्णपदक मिळवले आहे. प्रिया मलिकने सन 2020 मध्ये आयोजित राष्ट्रीय स्कूल गेम्समध्ये सुवर्ण मिळवले होते.

मीराबाई चानूने शनिवारी टोकियो ऑलिम्पिक 2020 मध्ये देशासाठी रौप्यपदक जिंकून इतिहास रचला होता. प्रिया मलिकच्या यशाने देशाला सुवर्ण पदक मिळालं आहे. प्रियाच्या या यशाबद्दल ट्विटरवरून लोकांनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. प्रिया मलिक ही भरतसिंग मेमोरियल स्पोर्ट्स स्कूल मधील खेळाडू आहे.

प्रियाच्या त्या कर्तृत्वावर हरियाणाचे क्रीडामंत्री संदीप सिंग यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. “हंगेरीच्या बुडापेस्ट येथे आयोजित जागतिक कॅडेट कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रिया मलिकचे अभिनंदन संदीप यांनी केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments