Petrol/Desel : काय आहेत Petrol Desel चे दर, महाराष्ट्राबाहेरही पाहा काय आहे स्थिती
Petrol/Desel : सर्व महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरांनी प्रतिलीटर शंभरी पार केली आहे.

Petrol/Desel : सर्व महानगरांमध्ये पेट्रोलच्या दरांनी प्रतिलीटर शंभरी पार केली आहे. ओएमसी अधिकाऱ्यांच्या मते आंतरराष्ट्रीय तेलाचे दर कायम राहिल्यास तेलाच्या किंमतीत आणखी वाढ होऊ शकते.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमुळे आज सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. रविवारी सरकारी तेल कंपन्यांनी किंमती वाढवल्या नाहीत. एक दिवस आधी दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमतींमध्ये 35 पैसे आणि 26 पैसे प्रतिलीटर वाढ झाली. त्यानंतर राजधानीत एक लिटर पेट्रोलची किंमत 100.91 रुपये आणि डिझेलची किंमत 89.88 रुपयांवर पोहोचली.
डिझेलचे दर देशभरातील शतकाच्या खुणा जवळ आहेत. २ मे रोजी पहिल्यांदाच मुंबई शहरातील पेट्रोलची किंमत शंभर रुपयांच्या पुढे गेली होती, त्यानंतर आता पेट्रोलच्या किंमतीने प्रतिलीटर 109.63 रुपयांचा उच्चांक गाठला आहे. शहरातील डिझेलचे दरही प्रतिलीटर 97.44 रुपयांवर पोचले आहेत, जे महानगरांमध्ये सर्वाधिक आहे.
मोठ्या शहरांमध्ये काय परिस्थिती
मुंबईत पेट्रोल 106.92 रुपये तर डिझेल प्रतिलीटर 97.46 रुपये आहे.
चेन्नईमध्ये पेट्रोल 101.67 रुपये तर डिझेल प्रतिलीटर 94.39 रुपये आहे
कोलकातामध्ये पेट्रोल 101.01 रुपये आणि डिझेल 92.97 रुपये प्रतिलीटर आहे
बेंगळुरूमध्ये पेट्रोल 104.29 रुपये तर डिझेल 95.26 रुपये प्रतिलीटर आहे
चंदीगडमध्ये पेट्रोल 97.04 रुपये तर डिझेल 89.51 रुपये प्रतिलीटर आहे
लखनौमध्ये पेट्रोल 98.01 रुपये आणि डिझेल 90.27 रुपये प्रतिलीटर आहे
रांचीमध्ये पेट्रोल 95.96 रुपये तर डिझेल 84. 84 रुपये प्रतिलीटर आहे
पाटण्यात आज पेट्रोल 103.18 रुपये तर डिझेल 95.46 रुपये प्रतिलीटर आहे
भोपाळमध्ये पेट्रोल आज 109.24 रुपये तर डिझेल 98.67 रुपये प्रतिलीटर आहे.