खूप काही

POLITICAL UPDATE : देवेंद्र फडणवीस अडचणीत, त्या 5 अधिकाऱ्यांची होणार चौकशी? Pegasus चं भांड फुटणार

प्रशासनाच्या पाच माहिती आणि तंत्रज्ञान खात्यातील अधिकाऱ्यांचा इस्त्राईल दौऱ्याच नेमकं कारण काय होतं? या दौऱ्याचा आणि पेगासिस या सॉफ्टवेअर यांचा संबंध काय?

political update : 2019 विधानसभेसाठी राज्यात निवडणुका झाल्या आणि त्यानंतरच सत्ता स्थापनेला सुरुवात झाली, त्यात भाजप आणि शिवसेनेच्या युतीमध्ये मुख्यमंत्री पदावरून वाद होऊ लागला, त्या दरम्यान शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्र येण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्या. मात्र याच प्रक्रियेदरम्यान मंत्रालयातील माहिती आणि जनसंपर्क कार्यालयातील पाच अधिकारी इस्त्राईलला गेले होते.

नेमका दौरा कशासाठी?

मंत्रालयातील हे पाच अधिकारी हे शेती संबंधित विषयाचा अभ्यास करण्यासाठी इस्रायलला गेल्याचं विरोधी पक्षनेते व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे. पण त्यांचा हा दावा काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी खोडला आहे. कागदपत्र सादर करून फडणवीसांनी सादर केलेला अहवाल फेटाळून लावला आहे. हे अधिकारी सोशल मीडिया आणि सायबर क्राईमचा अभ्यास करण्यासाठी इस्रायलला गेले असल्याचा दावा सावंत यांनी केला आहे. त्यामुळे हा दौरा कशासाठी होता? या दौऱ्यात काय अभ्यास केला? कुणी ट्रेनिंग दिलं? कुठं ट्रेनिंग दिलं? पेगाससशी यांचा काय संबंध आहे का? त्याचा सरकारला काय फायदा झाला? आदी गोष्टींची माहिती सरकारने मागवली आहे. त्यामुळे हे अधिकारी अडचणीत आल्याचं सांगण्यात येत आहे.

महत्त्वाचे 5 मुद्दे

प्रशासनाच्या पाच माहिती आणि तंत्रज्ञान खात्यातील अधिकाऱ्यांचा इस्त्राईल दौऱ्याच नेमकं कारण काय होतं? या दौऱ्याचा आणि पेगासिस या सॉफ्टवेअर यांचा संबंध काय?येवढंच नव्हे तर त्यांच्या या दौऱ्यावर 20 लाख रुपयांचा खर्च झाला, 14 नोव्हेंबर 2019 रोजी दहा दिवसांचा हा दौरा होता. विशेष म्हणजे आचारसंहितेच्या काळात निवडणूक आयोग किंवा केंद्र सरकारच्या परवानगीने हा दौरा करणं गरजेचं होतं; मात्र कोणाचीही परवानगी न घेता दौरा केल्याची माहिती समोर आली आहे, त्यामुळेच ठाकरे सरकारने या दौऱ्याबद्दलचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

एकीकडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इस्राईल दौरा हा शेती आणि तंत्रज्ञान याबाबतची माहिती घेण्यासाठी गेला होता असं म्हटलं आहे, मात्र, आता दौऱ्याबाबत मोठा खुलासा झाला आहे. त्यात यासंदर्भात दहा गोष्टी समोर आल्या आहेत. वेब मीडियाचा वापर, नव्या मार्गाचा अभ्यास, सायबर गुन्ह्याबद्दल जनजागृती, अशा अनेक दहा गोष्टी नवीन खुलाशातून समोर आल्या आहेत. त्यामुळेच मंत्रालयातील अधिकाऱ्यांचा दौरा नक्की कशासाठी झाला होता, या दहा गोष्टींचा खुलासा आता झालेला आहे.

1) सरकारसाठी उत्तम सोशल मिडीया प्लॅन तयार करण्याचं नवं तंत्र शिकण्यासाठी आणि वेब मिडीया वापराच्या नव्या मार्गाचा अभ्यास

2) स्मार्ट सिटी प्रकल्पामध्ये सरकरी जनसंपर्कचा वापर कसा केला जावा, जनसंपर्काचे नवीन ट्रेंड्स काय असू शकतात, ते समजून घेणे

3) नवीन अत्याधुनिक सोशल मीडियाच्या माध्यमांना दुर्गम आणि ग्रामीण भागात पोचवण्याचा कसा प्रयत्न करता येईल, लोकांनामध्ये सायबर गुन्ह्यांबद्दल जनजागृती कशी करता येईल, हे शिकणे

4) माध्यमांचा वापर हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये कसा करावा, या संदर्भातील वेगवेगळ्या माध्यमांच्या संबंधित गोष्टींचा अभ्यास करणे

5) पर्यटन क्षेत्रामध्ये जनसंपर्काचा वापर उत्तम आणि कितपत, कसा करता येईल, डिजिटल मार्केटिंगच्या वापरासंबंधी माहिती मिळवणे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments