Political update : नाहीतर राणेंना जशास तसे उत्तर देऊ, शिवसैनिक गडाडला
नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं, नाहीतर ते कधीच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले नसते, असा खोचक टोला शंभूराज देसाईंनी नारायण राणे यांना लगावला आहे.

Political update : कोकणात पूर परिस्थितीची पाहणी करताना एका अधिकाऱ्याची नारायण राणे बोलत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्या प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील नारायण राणे यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती, तर टीकादेखील केली होती. परंतु आता जिल्हाधिकाऱ्यांना फोनवरून झापताना मुख्यमंत्र्यांचा बाबत एकेरी उल्लेख केल्याबद्दल शिवसेनेचे नेते आणि राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी नारायण नारायण राणेंचा टोला लगावला आहे. (Shambhuraj Desai responds to Narayan Rane’s criticism of CM Uddhav Thackeray)
नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं, नाहीतर ते कधीच मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचू शकले नसते, असा खोचक टोला शंभूराज देसाईंनी नारायण राणे यांना लगावला आहे.
नारायण राणे यांचं तोंड बंद करण्याची ताकद प्रत्येक शिवसैनिकात आहे. पक्षानं सांगितलं आहे म्हणून आम्ही शांत आहोत. जर पक्षाने सांगितलं तर जशास तसं उत्तर देऊ. आम्ही आधी शिवसैनिक आहोत आणि नंतर मंत्री. मात्र माननीय मुख्यमंत्री यांनी आम्हाला आदेश दिले आहेत की या आपत्तीच्या काळामध्ये लोकांच्या मदतीकडे लक्ष द्या, पक्षप्रमुखांनी आम्हाला शांत राहण्याचा आदेश दिला आहे, म्हणून आम्ही शांत आहोत परंतु, राणे यांनी विचारपूर्वक शब्द वापरावेत, अशा शब्दात शंभुराज देसाई यांनी नारायण राणेंना इशाराच दिला आहे.