खूप काही

Political update : पंकजा मुंडेंचा लवकरच शिवसेनेत प्रवेश? सेनेच्या नेत्याने दिले संकेत

राज्याच्या राजकारणात मुंडे परिवाराचे काम मोलाचे आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणूनच मुंडे साहेबांच्या वारसदाराला कुठेतरी न्‍याय, सन्‍मान मिळायला हवा

Political update : सध्या भाजपच्‍या नेत्‍या पंकजा मुंडे यांच्‍या समर्थकांनी पंकजा ताईंनी शिवसेनेत प्रवेश करावा, अशी मागणी करत सोशल मीडियावर मोहीम सुरू केली आहे. अशी माहिती शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी दिली. जळगाव तालुक्यातील किनोद येथे शुक्रवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एका कार्यक्रमाला उपस्थित दिली. या कार्यक्रमानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर पंकजा मुंडे यांना भाजपकडून हवे तसे प्रतिनिधीत्‍व मिळाले नाही. मुळात गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसाठी, भाजपच्या भवितव्यासाठी गरजेच्या काळात खूप मोठे काम केले आहे. आता मात्र त्‍यांची मुलगी पंकजा मुंडे यांना प्रतिनिधित्वासाठी संघर्ष करावा लागतोय. एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले नव्‍हते. याचाच अर्थ ओबीसी समाजाचे भाजपकडून कुठेतरी खच्‍चीकरण केले जात असल्याचा आरोप गुलाबराव पाटील यांनी केला आहे.

राज्याच्या राजकारणात मुंडे परिवाराचे काम मोलाचे आहे. हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणूनच मुंडे साहेबांच्या वारसदाराला कुठेतरी न्‍याय, सन्‍मान मिळायला हवा अशी समाजाची अपेक्षा आहे. पंकजा मुंडे या शिवसेनेत आल्‍या तर त्‍यांचे स्‍वागतच आहे. पंकजा मुंडे यांना योग्‍य स्‍थान आणि प्रतिनिधित्‍व शिवसेनेत मिळेल अशी समाजाची अपेक्षा आहे.

यामुळे पंकजा मुंडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर त्‍यांचे स्‍वागतच राहील. प्रवेश केल्‍यानंतर त्‍यांना पद काय द्यायचे, हे मुख्‍यमंत्री उद्धव ठाकरे ठरवतील. ते सांगण्यासाठी मी एवढा मोठा नाही, असेही पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले. त्‍यांना आमच्याकडे स्‍थान आणि सन्‍मान दोन्ही मिळेल, असे सांगत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पंकजा मुंडे यांना थेट शिवसेनेत येण्याचे आवाहनच केले आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments