खूप काही

POLITICAL UPDATE : निलंबित 12 भाजपा आमदारांची थेट सर्वोच्च न्यायालयात धाव

निलंबनाच्या आदेशावर तात्पुरती स्थगिती मिळावी आणि याचिकेवर निर्णय येईपर्यंत या बारा आमदारांना त्यांचे सर्व अधिकार द्यावे अशी मागणी देखील या बारा आमदारांकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली.

Ashish shelar : विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये भाजपच्या 12 आमदारांचं 1 वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या सभेमध्ये भाजप आमदारांनी धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदारांनी भर विधानसभेमध्ये मोठा गोंधळ घातला होता, म्हणून त्यांच्यावर ही कारवाई केली होती.

या कारणामुळेच विधानसभा अध्यक्षांच्या दालनात तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी शिवीगाळ आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजप आमदारांवर केला आहे. त्याचबरोबर हा लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचा गंभीर आरोप देखील भास्कर जाधव यांनी केला होता. त्यानंतर संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी भाजप आमदारांच्या निलंबनाचा ठराव मांडला आणि त्यानंतर आवाजी बहुमताने भाजपाच्या बार आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे.

भाजपच्या 12 आमदारांचे निलंबन हे चुकीच्या पद्धतीने बेकायदेशीररित्या असल्याचं आता हे आमदार बोलत आहेत, त्यामुळे ठरावाद्वारे आम्हाला निलंबित करण्यात आलं आहे, तो ठराव अवैध ठरवण्यात यावा अशी मागणी थेट सर्वोच्च न्यायालयात केली आहे, या बारा आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात ही निलंबन मागे स्थगित करण्यासाठी थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

आता निलंबनाच्या कारवाईविरोधात भाजपच्या बारा आमदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. भाजप आमदारांनी हे निलंबन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका देखील दाखल केले आहेत, अशी माहिती भाजप आमदार आशिष शेलार यांनी माध्यमांना दिली आहे. तसेच आम्ही शेवटपर्यंत लढू, अशी प्रतिक्रिया आशिष शेलार यांनी दिली आहे.

निलंबनाच्या आदेशावर तात्पुरती स्थगिती मिळावी आणि याचिकेवर निर्णय येईपर्यंत या बारा आमदारांना त्यांचे सर्व अधिकार द्यावे अशी मागणी देखील या बारा आमदारांकडून सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments