खूप काही

Political update : बंद दरवाजाआड आम्ही बोललो नाही, मुख्यमंत्र्यांचा फडवीसांना टोला

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये "मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे", असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Political update : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (30 जुलै रोजी) कोल्हापूरच्या पूरग्रस्त भागाचा दौरा केला. त्याचवेळी देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकरही त्याठिकाणी उपस्थित होते, त्यामुळे त्यांच्यावर त्यांची बैठक झाली, या बैठकीत काय झालं, कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाल्या, त्या सर्व मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितल्या.

कोल्हापूरच्या दौऱ्यावर जाण्यावेळी देवेंद्र फडणवीस तिथेच आहेत, हे मला कळलं. त्यांना मी सांगितलं, थांबा मी येतोय. कारण मला लोकांच्या जिवाशी खेळ करायचा नाही. यात कुठेही मला राजकारण करायचं नाहीये. यात त्यांच्याही काही चांगल्या सूचना असतील, तर त्याचं स्वागतच करू. तिथे काही बंद दरवाजाआड आम्ही बोललो नाही. दरवाजेच नव्हते. सगळ्यांच्या घरात पाणीच घुसलं होतं, तर दरवाजे का राहतायत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना टोला लगावला.

मी त्यांना सांगितलं की तुम्हाला मी बोलवतो. मुंबईत आपण भेटू. ज्या सूचना असतील, त्यांच्यावर एकमत होईल. माझ्यासोबत तीन पक्ष आहेतच. तो चौथा पक्ष देखील येईल. महाराष्ट्रातले हे प्रमुख पक्ष एकत्र आल्यानंतर, उद्या जे काही आपण निर्णय घेऊ, त्याच्या आड कुणीही येणार नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज कोल्हापुरच्या दौऱ्यावर असताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही नेते देखील आज कोल्हापूर जिल्ह्यात होते, दोन्ही नेत्यांनी स्वतंत्रपणे कोल्हापुराच्या परिस्थितीची पाहणी करून स्वतंत्र पर एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका देखील मांडली. यावेळी  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये “मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नसून मदत करणारा मुख्यमंत्री आहे”, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी पॅकेज असो की घोषणा, सामान्य माणसाला पैसे मिळणे मदत मिळणे आवश्यक आहे असं भाष्य देखील केले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments