आपलं शहर

Political Update:काँग्रेस मध्ये कोणताही अंतर्गत वाद नाही – काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले

Political Update:काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी खणिकरण विकास महामंडळ संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.

Political Update: काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी खणिकरण विकास महामंडळ संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. खणिकरण विकास महामंडळामध्ये झालेला भ्रष्टाचराविरुद्ध मुख्यमंत्र्यांना पत्र हे पत्र असल्याचं त्यांनी एका मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

यात नागपूरच्या खणिकरण विकास महामंडळाने कोलवॉशिंगच्या टेंडरमध्ये गैव्यवहार झालाच्या आरोपही करण्यात आला आहे. या पत्रात कुठेही ऊर्जा विभाग विरुध्द लिहलं नसून काँग्रेसमध्ये कोणतेही अंतर्गत वाद नाहीत, त्याबरोबर नितीन राऊत आणि माझ्यामध्ये कोणते वाद नसल्याचं त्यांनी पत्रकारांशी बोलताना कबूल केलं.

काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद दाखवण्याचा प्रयत्न

खणीकरणामध्ये होणारा भ्रष्टचार महाराष्ट्राला नवीन नाही. हा कोळसा ऊर्जा विभागाकडे कमीत कमी किंमतीमध्ये गेला पाहिजे, त्याने महाराष्ट्रामध्ये वीज ग्राहकांना त्याचा लाभ मिळेल, याच सगळ्या करणांमुळे महाराष्ट्रात वीज महाग होत चालली आहे. असंही मत पटोले यांनी व्यक्त केले आहे. ही चूक पूर्णपणे खणीकरण महामंडळाची आहे, असं ही नाना पटोले यांनी स्पष्ट केलं आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments