खूप काही

POLITICS UPDATE : राज्यात मंत्रिमंडळ विस्तार? काँग्रेसच्या या नेत्यांना धक्का

आताच काही दिवसांपूर्वी केंद्रिय मंत्रीमंडळात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपण सर्वांनीच पहिला; पण आता तसाच बदल राज्य मंत्रिमंडळात देखील लवकरच बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

politics update : आताच काही दिवसांपूर्वी केंद्रिय मंत्रीमंडळात मोठ्या प्रमाणात बदल झालेला आपण सर्वांनीच पहिला; पण आता तसाच बदल राज्य मंत्रिमंडळात देखील लवकरच बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

कदाचित नव्या फेरबदलात काँग्रेसकडून मत्स्य व्यवसाय मंत्री अस्लम शेख आणि आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी यांना सर्वात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातील प्रत्येकी एक जागा भरण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. (Maharashtra: Uddhav Thackeray cabinet expansion soon)

मागील काही महिन्यात राज्य मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते, त्यात शिवसेनेचे आमदार संजय राठोड आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी मंत्रिपद गमावले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांची एक एक जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून ही जागा भरण्यात येणार आहे अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

त्यासाठी दोन्ही पक्षात मंत्रिपद मिळावं म्हणून जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र, पक्ष श्रेष्ठी कुणाच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ टाकणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. खराब कामगिरी असणाऱ्या मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढून टाकले जाण्याची शक्यता काँग्रेसमध्ये घटत आहे. त्यामुळे अस्लम शेख आणि केसी पाडवी यांना काँग्रेसकडून डच्चू दिला जाऊ शकतो, अशा चर्चा आहेत.

तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात काही नवीन बदलही पाहायला मिळणार आहेत. आणि हे बदल तिन्ही पक्षांकडून पक्ष संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने मंत्रिपदं दिली जाण्याची शक्यता आहे. पक्षाला उभारी देणाऱ्या आमदाराला मंत्रिपद दिलं जाणार असून ज्या भागात पक्ष कमकुवत आहे, अशा भागातील आमदाराला नव्या विस्तारात संधी दिली जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments