भुक्कड

MUMBAI MONSOON UPDET : मुंबईत पावसाला दमदार सुरुवात, पाहा कुठे आणि कधी पडणार पाऊस

जूनच्या सुरुवातीनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने अखेर आता हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आता मान्सूनला सुरुवात झाली आहे.

mumbai Monsoon updet : जूनच्या सुरुवातीनंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने अखेर आता हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टी आणि मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात आता मान्सूनला सुरुवात झाली आहे.

बंगालच्या उपसागरावर पुन्हा कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. परिणामी मान्सूनसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली असून पुढील पाच दिवस राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) याबाबत आज अ‍ॅलर्ट जारी केला आहे.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी पुढील पाच दिवस ‘रेड अ‍ॅलर्ट’ असणार आहे आणि मुंबईसह उपनगरासाठी पुढील चार दिवस ‘ऑरेंज अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला आहे. गेले दोन-तीन दिवसांपासून मुंबई शहरात देखील पावसाची रिमझिमची सुरूवात झाली आहे. मात्र आता जोर वाढणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. (Red Alert for Konkan, Central Maharashtra for next five days; Four days ‘Orange Alert’ in Mumbai)

कोकणात रेड अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला

रेड अ‍ॅलर्ट’ जारी करण्यात आला हवामान खात्याच्याकडून कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे, रविवारी दुपारनंतर कोकणातील सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण परिसरला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर, राजापूर, लांजा परिसरात शनिवारी रात्रीपासून पावसाने दमदार हजेरी लावली आहे. दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी या तालुक्यांमध्ये आज सकाळपासून पावसाच्या रिमझिम सरींना सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रविवारी सकाळपासून विद्युत पुरवठादेखील खंडित झाला आहे. पावसाच्या समाधानकारक हजेरीमुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना नक्कीच गती मिळाली आहे.

सिंधुदुर्गात रात्रीपासून मुसळधार

सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरी 1323.91 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. सततच्या पावसामुळे जिल्ह्यातील नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कुडाळ, कणकवली, वेंगुर्ले, सावंतवाडी, दोडामार्गमध्ये मुसळधार तर देवगड, वैभववाडीत संततधार पाऊस सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments