आपलं शहर

Mumbai Rain Update : मुंबईसह ठाणेकरांनो सावधान, लवकरच आस्मानी संकट येणार

पुन्हा एकदा हवामान खात्याने मुंबईसह ठाणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे,

Mumbai Rain Update : यंदा पावसाने पश्चिम महाराष्ट्रासह कोकणामध्ये हाहाकार माजवला आहे, अनेक ठिकाणी महापूर, भूस्खलन सारख्या घटना घडून शंभरहून अधिक जणांचे प्राण गेले आहेत, मात्र आता पुन्हा एकदा हवामान खात्याने मुंबईसह ठाणेकरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. (Rain warning in Mumbai, Thane, Satara, Kolhapur and Pune districts)

पुढील तीन तासांत मुंबईसह ठाणे, रायगड, नागपूर, पुणे, सातारामधील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा जोर असणार आहे.

हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी या संदर्भातील माहिती दिली आहे. त्यांच्या अंदाजानुसार 30 जुलै रोजी मुंबईसह ठाणे, रायगड, नागपूर, पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट दिला आहे. तर, 31 जुलै रोजी रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा या चार जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट असणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.

1 ऑगस्टला फक्त रत्नागिरी, रायगड या दोन जिल्ह्यांना पावासाचा यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील सर्व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन राज्य सरकार, स्थानिक प्रशासन आणि हवामान विभागाने केले आहे.

मुंबई वेधशाळेने राज्यातल्या अनेक भागात 2 ऑगस्टपर्यंत मुसळधार आणि अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पाऊस पडू शकतो, या दरम्यान काही ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येणार नसल्याचंही हवामान विभागाने म्हटलं आहे. या व्यतिरिक्त अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर मुंबई आणि नागपूर वेधशाळेच्या वेबसाईट्सला भेट देऊन, तुम्ही त्या संदर्भातील सर्व माहिती जाणून घेऊ शकता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments