RAJ THACKERAY : राज ठाकरेंनी बॉलिवूडकरांना झापलं, ते नक्की आहेत कुठे?
महाराष्ट्रातील एवढी भीषण परिस्थिती लक्षात घेता, माझ्याच राज्यात राहून मोठे झालेल्या बॉलीवूडकरांनी जरातरी संवेदनशीलपणा दाखवणे गरजेचा आहे.

Raj Thackeray : महाराष्ट्रात आठवडाभरापासून पावसाने थैमान घातलं आहे. आणि त्यातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसैनिकांना महाराष्ट्राच्या मदतीसाठी पुढे होण्याचे आव्हान केले आहे. त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण भयानक पूर-परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत.
महाराष्ट्रातल्या या अवघड परिस्थितीमध्ये राज ठाकरे यांनी मनसैनिकांना जितकं जमेल तितकी पूरग्रस्तांना मदत करा, असे आव्हान केले आहे, आता सध्या लोकांचा जीव महत्त्वाचा आहे, त्यानंतर जसा जसा पुर ओसरेल तशी तशी रोगराई मोठ्या प्रमाणात वाढू लागेल, त्यामुळे तुम्ही सर्वांनी लक्ष देऊन त्यावर तातडीने मदत करा, परंतु हे सर्व करताना स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी मनसैनिकांना केले आहे.
महाराष्ट्र सैनिकांना आवाहन… pic.twitter.com/JiT5I13l4Q
— Raj Thackeray (@RajThackeray) July 23, 2021
महाराष्ट्र संपूर्ण ठिकाणी भयंकर अशी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अनेक विचित्र अशा घटना घडल्या आहेत, अनेक ठिकाणी दरडी देखील कोसळल्या आहेत. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आणि त्यात जवळपास 110 नागरिकांनी आपले जीव देखील गमावले आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थांकडून तसेच शासनाकडून या संदर्भात मदतकार्य सुरु आहे.
अनेक बॉलिवूड कलाकारांना आपण आयडियल मानतो, मात्र ते कलाकार मंडळी मदत करताना कुठेही दिसत नाहीत, बॉलिवूडचे कलाकार नक्की आहेत कुठे, इतर राज्याच्या कुठल्याही घटनेमध्ये बॉलिवूडचे कलाकार धावून जातात, मग आता महाराष्ट्राच्या इतक्या भीषण परिस्थितीत त्यांचे साधे ट्विट देखील दिसत नाहीये, त्यामुळेच मनसेने काम पकडत या सर्व मंडळींना मदतीसाठी पुढे येण्याचे आवाहन केले आहे.
महाराष्ट्रातील एवढी भीषण परिस्थिती लक्षात घेता, माझ्याच राज्यात राहून मोठे झालेल्या बॉलीवूडकरांनी जरातरी संवेदनशीलपणा दाखवणे गरजेचा आहे. त्यांनी मदतीचा हातभार लावाला पाहिजे, असे आवाहनही मराठी चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी बॉलीवूडच्या कलाकारांना केले आहे.
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) July 24, 2021